जालना शहरातील उच्चभ्रु वस्तीतील लुटी प्रकरणाची उकल करण्यास पोलिसांना यश…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ४/१२/२३ रोजी फिर्यादी कविता सुशिल शर्मा रा. सोमेश रेसीडेंन्सी जालना, या त्यांचे राहते घरी दुपारी ३.१५ वा चे दरम्यान त्याचे नातेवाईक महीलेसोबत  गप्पा मारत असतांना एक अनोळखी ईसमाने  आपले दोन साथीदारासोबत घरात प्रवेश  केला व त्यातील एकाने आपलेजवळील बंदुक फिर्यादी यांचे कानशिलात लावुन घरातील नगदी रोकड २ लक्ष रुपये व कपाटातील ७.५० लक्ष रुपये किमतीचे दागीने व २ मोबाईल लुटारुंनी लंपास केला अशा तक्रारीवरुन पोलिस ठाणे सदर बाजार गुरनं. 1043/2023 कलम 397,34 भादवि सह कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला होता

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना आदेशीत करुन योग्य त्या सुचना दिल्या त्यांच्या निर्देशानुसार पोलिस पथके तयार करुन तांत्रीक तपास करुन घटनास्थळावरील सिसिटिव्ही फुटेज तपासले असता सदर घटनेत एकुन १० व्यक्तींचा सहभाग असल्याचे आढळताच पोलिसांनी प्रथमदर्शनी गुप्त माहीतीनुसार
1) कुलदीप उर्फ जज्जु अंबादास जगधने वय 21 वर्ष रा. जमुना नगर जुना जालना.
2) योगेश गणेश गायकवाड वय 22 वर्ष रा. जमुना नगर जुना जालना.
3) विकास उर्फ विक्की प्रकाश लोंढे वय 22 वर्ष रा. लहुजी चौक, नुतन वसाहत जालना.





यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपुस केली असता पहीले उडवाउडवीची उत्तरे देणारे पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखे बोलु लागले व त्यांनी सदरचा गुन्हा आपले साथीदारांसोबत केल्याचे कबुल केले व लुटलेल्या  ७,५९,०००/- रु किंमती मुद्देमालापैकी आरोपी कडुन  रोख रक्कम ४७,७००/- रु फिर्यादीचे दरोडयात चोरलेले २ मोबाईल ४०,०००/-रु गुन्हयात वापरलेले आरोपीतांचे मोबाईल ६४,०००/- दरोडयात चोरीला गेलेले चांदीचे शिक्के ३०,०००/- गुन्हयात वापरलेले मोटारसायकल २ किमंती १,०००००/- रु असे एकुण २,८१,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
१) शेख आरेफ शेख मुक्तार रा जमुनानगर जुना जालना २)दिनेश दत्तात्रय पवार, रा. जालना ३) योगेश प्रकाश हाडे रा. सतकर नगर ४) कल्याण भोजणे रा. सतकर काँप्लेक्सच्या पाठीमागे जालना ५) बाळु सरोदे व ईतर २  असे एकुम १० आरोपी  गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक  शैलेश बलकवडे ,अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि वाघ, ग्रेपोउपनि राऊत व सोबत स्थागुशाचे अमंलदार पोहवा कांबळे, कायटे, गडधे,  तंगे,  चौधरी, राठोड,आडेप,बाविस्कर, मपोना  शडमल्लु, श्रीवास,पोशि सहाने,  भोसले, सोनवणे, मपोशि बांडे, चापोशि  पैठणे, मुळे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!