धारदार तलवारी सह दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
धारदार तलवार बाळगणारे दोन आरोपी जालना स्थागुशा च्या ताब्यात…
जालना (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्या बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक आयुश नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्या वरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने (दि.12जानेवारी) रोजी पोलीस ठाणे कदिम जालना हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली होती की, ईसम नामे सादतखान हसदखाँन रा.फुकट नगर जालना हा अवैधरित्या धारधार शस्त्र (तलवार) व ईसम नामे हैदरशहा नवाब शहा रा.इंदिरानगर, जुना जालना हे त्याचे राहते घरी स्वतःचे ताब्यात अवैध रित्या धारधार तलवार बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्याने सदर दोन्ही ईसमांचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने ईसम नामे सादतखान हसदखॉन रा. फुकट नगर याचे ताब्यातुन 02 धारधार तलवार व ईसम नाम हैदरशहा नवाब शहा रा. इंदिरानगर, जुना जालना याचे ताब्यातुन 01 धारधार तलवार जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीतां विरुध्द पोलीस ठाणे कदिम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुश नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार विनायक कोकणे, गोपाल गोशिक, सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, लक्ष्मीकांत आडेप, सचिन आर्य, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, भागवत खरात, कैलास चेके, योगेश सहाणे सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.