
प्रवाशांचे किंमती वस्तु चोरणारी बंटी बबली ची जोडी स्थागुशा पथकाचे ताब्यात…
गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील पर्समधुन मोबाईल, पैसे चोरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. पाच मोबाईल हस्तगत….
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी/अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 10/02/2024 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरीचे मोबाईल कमी किमतीत विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव
1) अजीम गौस शेख, वय 25 वर्ष, राहणार मदनी नगर, लेबर कॉलनी जवळ, लातूर सध्या राहणार खाडगाव रोड,लातूर.
असे असल्याचे सांगितले.नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो व त्याची पत्नी असे दोघे मिळून बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे चढ-उतार करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्समध्ये, खिशामध्ये ठेवलेले पैसे व मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. तसेच सदरचे मोबाईल कमी किमतीत लोकांना विकत असल्याचे सांगितले.
त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे निलंगा येथे पर्स व त्यामध्ये ठेवलेली 2,500 रुपयाची रोख रक्कम व एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचा दिसून आला.
नमूद आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून गुन्ह्यात चोरलेला एक मोबाईल व इतर बसस्थानक रेल्वेस्थानकातून चोरलेले चार मोबाईल असे एकूण पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नमूद आरोपीला ताब्यात घेताच त्याची पत्नी फरार झाली असून तिचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अमलदार रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजेश कंचे, पोलिस ठाणे शिवाजीनगर चे पोलिस अंमलदार युवराज गिरी, पोलिस ठाणे एमआयडीसीचे सहायक फौजदार बेल्लाळे, पोलिस अमलदार अर्जुन राजपूत, पोलिस ठाणे रेणापूरचे मुन्ना मदने, महिला पोलिस अमलदार मेघा देवमाने यांनी केली आहे.




