
स्थानिक गुन्हे शाखेने प्रवासी वाहनासह एकास ताब्यात घेऊन,जप्त केला १६ लाखाचा गुटखा…
स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन पाठलाग करुन उदगीर-अंबेजोगाई रस्त्यावर 16 लाख 33 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू केला जप्त,एकास वाहनासह घेतले ताब्यात……
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित होते


त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत पेट्रोलिंग करीत असतांना दिनांक 13/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी व कर्नाटक ते अंबाजोगाई व्हाया उदगीर वाहतूक होणार आहे. अशा खात्रीशीर बातमीवरुन सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 13/12/2024 दुपारी उदगीर येथे सापळा लावून तसेच सदर गाडीचा जवळपास 20 किलोमीटर पाठलाग करून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन क्रमाक हुंडाई कंपनीचे क्रेटा असे असून त्याचा क्रमांक एम.एच. 24 ए.डब्ल्यू. 9899 असा असल्याचे दिसले सदर वाहनास नळेगाव जवळ उदगीर ते घरणी मोड परिसरामध्ये ताब्यात घेतले त्यातील ईसमास ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सुरज दत्तात्रेय खंडापुरे, वय 32 वर्ष, राहणार साळुंकवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड असे सांगीतले

सदर वाहनाची झडती घेतली असता. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधीत तंबाखु वाहनासह 16 लाख 33 हजार 700 रू गुटखा व सुगंधित तंबाखू , कारसह जप्त करण्यात आला प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या अंबाजोगाई कडे घेऊन जात असताना गुटख्याची वाहतूक करीत असताना मिळून आला असल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे चाकुर चे पोलिस अधिकारी,अंमलदार करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अमलदार सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरूरे ,चालक पोलीस अंमलदार प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.


