लातुर येथील मोबाईल दुकानात दरोडा टाकणारी तसेच चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ७४ लाखाच्या मुद्देमालासह केली अटक…
लातुर – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की की, पोलिस ठाणे गांधीचौक हद्दीमध्ये दिनांक 27/08/2023 ते 28/08/2023 च्या मध्यरात्री चैनसुख रोड, तापडिया मार्केट जवळ असलेले बालाजी टेलिकॉम नावाचे मोबाईल दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने उचकावून ,आत प्रवेश करून विविध कंपनीचे मोबाईल, टॅब, स्मार्ट वॉच जुने मोबाईल, तसेच रोख रक्कम 12,000/- असा एकूण 1 कोटी 34 लाख 37 हजार 755 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गांधी चौक गु.र.नं 434/2023 कलम 457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी,(लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले तसेच पोलिस ठाणे गांधीचौक चे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलिस ठाणे गांधीचौक चे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून सदरचा गुन्हा करणारे गुन्हेगार मालेगाव नाशिक येथील राहणारे असून त्यांची आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी असल्याची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून बालाजी टेलिकॉम दुकानाचे शटर उचकवून चोरी करणारे आरोपींची टोळी हीच असल्याचे निष्पन्न झाले. सदर टोळीतील गुन्हेगार हे अतिशय सराईत असल्याने गुन्हा केल्यापासून पासून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी तसेच महाराष्ट्र बाहेर गुजरात मध्ये विविध ठिकाणी वास्तव्य करून वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत होते. त्यामुळे वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलिस ठाणे गांधीचौक चे संयुक्त पथके सदर टोळीला जेरबंद करण्यासाठी धुळे,मालेगाव, नाशिक व गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, वडोदरा या ठिकाणी रवाना करण्यात आले होते.सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपी
1) अकबरखान हबीबखान पठाण, वय 37 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक.
2) खैसरखान हबीबखान पठाण, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक.
3) मंहमद अहमद उर्फ कल्लू असलम अंसारी, वय 22 वर्ष, राहणार बिस्मिल्ला बाग, जेला हॉटेल जवळ, मालेगाव जिल्हा नाशिक.
4) झिब्राईल उर्फ जीब्बो इस्माईल अन्सारी, वय 20 वर्ष राहणार, अन्सार बाग, गुरुवार वार्ड, मालेगाव जिल्हा नाशिक.
5) आमिनखान इस्माईल अन्सारी, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी ,मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक.
यांना दिनांक 11/09/2023 रोजी पर्यंत विविध ठिकाणी शोध घेऊन यातील मुख्य आरोपी अकबरखान यास धुळे जिल्ह्यातून तर इतर आरोपींना त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.त्यांनी वर नमुद गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विविध कंपनीचे 195 मोबाईल, 10 स्मार्ट वॉच, 06 टॅब असा एकूण 74 लाख रुपयाचा मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली इनोव्हा कार व इतर मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
नमूद आरोपी आरोपींचे आणखीन काही साथिदार निष्पन्न झाले असून ते फरार असून गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल व फरार आरोपीचा शोध पथकाकडून घेण्यात येत आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे गांधी चौक चे सहाय्यक पोलिस निरीक्षक नौशाद पठाण हे करीत आहेत. नमूद आरोपींना अटक करून पुढील तपास करीत असताना नमूद आरोपींतावर महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, नाशिक, अकोला ,परभणी ,धुळे, नांदेड, धाराशिव, गडचिरोली ,छत्रपती संभाजी नगर, पुणे व इतर राज्यात चोरी संदर्भाने एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे गांधीचौक चे संयुक्त पथकातील पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले व पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, प्रवीण राठोड, नौशाद पठाण, पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार, आक्रम मोमीन, पोलीस अमलदार खुर्रम काझी, राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, रवी गोंदकर, राहुल सोनकांबळे, राम गवारे राजेश कंचे, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजू मस्के, राहुल कांबळे, संतोष खांडेकर,मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे, नकुल पाटील, दयानंद आरदवाड, रणवीर देशमुख, दत्तात्रय शिंदे, भाऊसाहेब मंतलवाड, दयानंद सारोळे, अभिमन्यू सोनटक्के, नंदकिशोर शेंडगे, महेश पारडे, शिवाजी पाटील, विनोद चलवाड, महादेव मामडगे, विष्णू पंडगे, परमेश्वर स्वामी, सायबर सेल लातूरचे पोलिस निरीक्षक अशोक बेले महिला साहेब पोलिस निरीक्षक गावंडे पोलिस अंमलदार संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांनी केली आहे.