दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक…

धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. म्हणुन एलसीबीचे पथक कारवाई साठी गस्तीस होते. त्या वेळी मिळालेल्या माहितीवरून दोन मोटार सायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून अंदाजे 1,10,000 ₹ किंमतीच्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.





या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नामे-गिरीश बजरंग कलशेट्टी, (वय 28 वर्षे), रा. कवठा, ता.उमरगा, जि.धाराशिव यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासीक 35 बुलेट मोटरसायकल क्र. एमएच 25 एपी 4133 ही (दि. 13जानेवारी) रोजी 01.00 ते 06.30 वा. सु.  गिरीश कलशेट्टी यांच्या संध्या बियर बारच्या समोरुन नारंगवाडी शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गिरीश कलशेट्टी यांनी (दि.17जानेवारी) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे गुरनं 32/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलीस ठाणे अहमदपुर हद्दीतील अंदाजे 70,000₹ किंमतीची एक काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले बाबत पोलीस ठाणे अहमदपुर येथे गुरनं 10/2024 कलम 379 भा.द.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हे माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत पोलीस ठाणे वाशी हद्दीतील परधी फाटा येथे आले असता त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, गोलेगाव पारधी पिढी येथील ईसम नामे- भिमा झुबंर काळे, रा. पारधी पिढी गोलेगाव ता.वाशी, जि.धाराशिव यांनी चोरुन आणल्या आहेत. अशी बातमी मिळाल्यावरुन  स्थानिक गुन्हेशाखा पोलीस पथकाने लागलीच गोलेगाव पारधी पिढी येथे जावून पाहिले असता एक युनिकॉर्न व एक बुलेट अशा दोन गाड्या मिळून आल्या. त्या गाड्याजवळ 1) भिमा झुंबर काळे रा. पारधी पिढी गोलेगाव ता. वाशी, 2) प्रकाश उर्फ ढाण्या नाना पवार रा. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा ता. वाशी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून नमुद गाड्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी आम्ही व इतर एक इसम यांनी नमुद गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने (दि.28जानेवारी) रोजी नमुद दोन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या कडून अंदाजे 1,10,000 ₹ किंमतीच्या दोन मोटरसायकल जप्त केल्या. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव उमरगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.



अशा प्रकारे सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरुन सपोनि. कासार, पोउपनि. संदीप ओहोळ सफौ/ काझी, सेपोहेकॉ/ जानराव, शौकत पठाण,  काझी, वाघमारे, पोना/ जाधवर, चालक पोलीस अंमलदार अरब यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!