सातारा LCB चा मोठा धडका: चोरीस गेलेला १३ लाखांचा टँकर २४ तासांत जप्त, दोघांना बेड्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सातारा / लोणंद:

फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राजवळून चोरलेला १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर अवघ्या २४ तासांच्या आत हस्तगत करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा टँकर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

‘सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा. लि. फलटण’ या कंपनीचा १३,००,०००/- रुपये किमतीचा निळ्या-पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर मौजे पाडेगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील शेती संशोधन केंद्र कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत पार्क केला होता.



दिनांक २६/०७/२०२६ (सायंकाळी ७:०० वा.) ते २८/०७/२०२६ (सायंकाळी ६:०० वा.) या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हा टँकर चोरून नेला. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३६/२०२६ BNS कलम ३०३(२) अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची कारवाई आणि सापळा

जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अधीक्षक  निखील पिंगळेअपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास करून वाहन चोरट्यांचा शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

दिनांक २९/०७/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना लिंबखिंड परिसरातील नॅशनल हायवे सर्व्हिस रोडवर दोन इसम चोरीचा टँकर विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.



माहिती मिळताच तपास पथकाने लिंबखिंड परिसरात छापा टाकला.

[जप्त केलेला मुद्देमाल]

• टँकर: टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर (क्रमांक MH-12-DT-3139) - किंमत ₹१३,००,०००/-
• मोटारसायकल: स्प्लेंडर मोटार सायकल (क्रमांक MH-53-4944)

संशयितांची चौकशी आणि उलगडा

सर्व्हिस रोडवर थांबलेल्या दोन इसमांकडे (जे स्प्लेंडर मोटारसायकलवर बसले होते) टँकरच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवून सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या एका मित्राच्या मदतीने पाडेगाव येथून हा टँकर चोरल्याची कबुली दिली. विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.



कारवाई करणारे पोलीस पथक

ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक  निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:

  • पोलीस निरीक्षक: विश्वजीत घोडके



  • सहाय्यक पोलीस निरीक्षक: अभिजीत यादव, रोहीत फरांदे

  • पोलीस उपनिरीक्षक: परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी

  • पोलीस अंमलदार: संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, हसन तडवी, अमोल माने, राकेश खांडके, सुजित भोसले, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, नवनाथ कदम, मनोज जाधव, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजु कांबळे, अरुण पाटील, शिवाजी भिसे, स्वप्नील दोंड, व विजय निकम.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि धडक कारवाईमुळे वाहन चोरांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!