अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत जुगारावर मोठी कारवाई; १३ आरोपींसह ४,०७,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अकोला, १५ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्र शासन पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला यांच्या वतीने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अकोला जिल्हयात अवैध जुगार चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पो.नि. नितीन लेहकर (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकला.

घडलेली घटना:

दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुगार रेड संदर्भाने अकोला शहर विभागात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, चांदखाँ प्लॉट, अकोला येथील एका घरात काही इसम पैशांची हारजीत करून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ व शिताफीने त्या ठिकाणी छापा टाकला.



ताब्यात घेण्यात आलेले १३ आरोपी:

घटनास्थळी जुगार खेळताना खालील १३ जण मिळून आले:



  1. अरबाज खान हुसेन खान



  2. मोहम्मद राहील मोहम्मद अकील

  3. शेख करीम शेख इब्राहिम उर्फ कल्लू काटा



  4. शेख इमरान शेख इब्राहिम

  5. शेख जुबेर शेख इब्राहिम



  6. मोहसीन खान जहीर खान

  7. शेख शकील शेख जलील

  8. मोहम्मद नवेद अब्दुल हमीद

  9. इर्शाद खान शकील खान

  10. सुमित सुखदेव कांबळे

  11. शेख सुमेर शेख लाला

  12. विजय सुरेश गलांडे

  13. अब्दुल रहमान अब्दुल हकीम (सर्व राहणार अकोला)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ₹४,०७,०३०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुढील कारवाई:

सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मार्गदर्शक व पथक:

सदरची यशस्वी कारवाई  पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक व मा. अपर पोलीस अधीक्षक बि. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन लेहकर (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी निलेश देशमुक, गोपाळ जाधव, विष्णू बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण आणि पोलीस अंमलदार व चालकांच्या पथकाने पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!