‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या
‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या
मुंबई – मुंबईत एका आरोपीने एटीएममधून पैसे लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. मशीनला डिस्पेंसिंग स्लॉट म्हणजेच ग्लू चिकटवून रोख रक्कम आरोपीने लुटली होती. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. हिमांशू राकेश तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बोरिवली पूर्व येथील एमजी रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ५ हजार रुपये लुटले. दरम्यान पोलिसांनी त्याला तासाभरात अटक केली आहे. या प्रकरणी शफीक सलीम शेख यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी सकाळी १२:३० च्या सुमारास घडली. तक्रारदार शफीक सलीम शेख यांनी बँक इंडियाच्या एटीएममधून खत्यातून ५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पैसे न येता शेख यांच्या बँक खात्यातून पैसे कापले गेल्याचा त्यांना मेसेज आला. एटीएममधून रोख रक्कम मिळाली नसतांना पैसे कसे आले नाही. याबाबत त्यांना शंका आली. त्यांनी एटीएमची पाहणी केली असता एटीएममध्ये कुणीतरी छेडछाड केल्याचे त्यांच्या निरदर्शनास आले. त्यांनी ही बाब बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून सांगितली. बँकेच्या अधिका-यांनी त्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज दिले, संध्याकाळी ६ ते रात्री १२:३० दरम्यानचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. यावेळी पोलिसांना आरोपी सापडला, ट्रॅफिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमधून त्याचा शोध घेण्यात आला. याच्या मदतीने आरोपी तिवारीला अटक करण्यात आली. आरोपी बोरिवली पूर्वेकडील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीतून तो गुजरातचे तिकीट काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या सामानाची झडती घेतली असता शेखने एटीएममधून काढण्याचा प्रयत्न केलेले ५ हजार रुपये रोख आणि इन्स्टंट ग्लूचा बॉक्स सापडला. तिवारी एटीएम मशीनच्या कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटला ग्लू चिकटवत होता. जेव्हा ग्राहक एटीएमने पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतांना ग्लू मुळे पैसे बाहेर येत नव्हते, दरम्यान, मशीन काम करत नसल्याचा संशयातून नागरीक निघून जायचे. यानंतर आरोपी तिवारी हा एटीममध्ये आत जायचा. यानंतर लावलेला ग्लू हा ब्लेडने कापायचा. डिस्पेंसिंग स्लॉटमधून रोख काढून टाकत तिवारी पैसे लुटत होता असे, कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी तिवारीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ (चोरी) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांना या मागे एखादी टोळी काम करत असल्याचा संशय आहे. तिवारीचे मुंबई आणि इतर राज्यांमध्ये अनेक साथीदार आहेत असे देखील पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.