
नागपूर : २४ तासांत घरफोडीचा उलगडा, २७.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त; नातेवाईक आरोपी अटकेत
नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत उलगडा केला आहे. या कारवाईत आरोपीला अटक करून २७ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:

-
घटनास्थळ: क्वार्टर क्र. ५३/४, केटीपीएस कॉलनी, कोराडी, पोलीस ठाणे कोराडी हद्द.
-
घटनाकाळ: दिनांक १६/०८/२०२६ रोजी १४:०० वा. ते १८/०८/२०२६ रोजी १०:०० वा. च्या दरम्यान.

-
फिर्यादी: संजय वामनराव वानखेडे (वय ५९ वर्षे).
नेमके काय घडले? फिर्यादी संजय वानखेडे यांनी आपल्या घरातील लोखंडी आलमारीत सोन्याचे विविध दागिने ठेवले होते, जे त्यांनी १६ ऑगस्ट रोजी रात्री तपासले होते. त्यावेळी घरी त्यांची पत्नी आणि त्यांचा पुतण्या शांतनु चंदु वानखेडे (वय २२ वर्षे, रा. माधान, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती) उपस्थित होते. १७ ऑगस्ट रोजी फिर्यादी घरीच होते.

१८ ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी आपल्या पुतण्या शांतनु याला गावी जाण्यासाठी बसस्टँडवर सोडून घरी परतले. सकाळी १०:०० वाजता आलमारीतील दागिने तपासले असता, त्यात ठेवलेले सोन्याचे विविध दागिने, सोन्याचे बिस्कीट, कॉईन आणि चांदीची भांडी गायब असल्याचे दिसून आले. पुतण्या शांतनु यानेच हा मुद्देमाल चोरून नेल्याची खात्री पटल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३०५ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कारवाई व तपास: गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन आरोपी शांतनु चंदु वानखेडे याला २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

जप्त केलेला मुद्देमाल:
-
२३० ग्राम सोन्याचे दागिने
-
०१ मोबाईल फोन
-
एकूण किंमत: ₹२७,७८,०००/- (सत्तावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये).
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तपास पथक:
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त दीपक अग्रवाल आणि सह. पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच पोलीस निरीक्षक भरत कव्हाडे, सपोनि. सचिन गायकवाड, पोउपनि. राहुल रोटे, सफौ. मुकेश खांडेरे, पोहवा. सुनिल यादव, दिनेश महल्ले, चंद्रशेखर भारती, पोअं. निलेश श्रीपात्रे, लक्ष्मीकांत सोनटक्के, हंसराज ठाकुर व मनिष मिश्रा यांनी या कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले.




