सराईत वाहन चोरट्यास हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ८ गुन्हे…
वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले, ०८ गुन्हे….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(५) चे रात्री ११.३० वा. व दि (६) चे सकाळी ०६.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १८, गल्ली नं. ३, महाकाली नगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी तन्मय राजेश नांदुरकर, वय १९ वर्षे यांनी त्यांची काळ्या लाल रंगाची पॅशन प्लस दुचाकी गाडी क्र. एम. एच. ३१ डि. आर. ८६६१ किं२०,०००/- रू. ची पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे हुडकेश्वर येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी समीर सिकंदर उईके, वय २० वर्षे, रा. खातरोड, एम. एच. ट्रेडर्स जवळ, भंडारा यास ताब्यात घेवुन, त्यास वाहनाबाबत विचारपूस केली असता, आरोपीने नमुद गुन्हयातील
वाहन चोरी केल्याची कबुली दिली.त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले वाहन किं २०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीची सखोल विचारपुस केली असता, आरोपीने वरील वाहन चोरीचे गुन्हयाव्यतीरीक्त पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतुन २) हीरो होंडा काळ्या लाल रंगाची पॅशन प्लस दुचाकी गाडी क्र. एम. एच. ३१ डि.जि. ०४९२ किंमती ३०,००० /- रू. ची ३) सिल्व्हर ग्रे रंगाची पॅशन प्रो दुचाकी गाडी क्र. एम. एच. ४९ ए. एच. ६२६० किंमती ३५,०००/- रू. ची ४) पांढऱ्या रंगाची हिरो माईस्ट्रोसदुचाकी गाडी क्र. एम. एच. ४९ ए ८१४२ किंमती ३०,००० /- रू. ची ५) काळ्या रंगाची सि.बी. शाईन दुचाकी गाडी क्र. एम.एच. ३१ डि. एच. ९५४४ किंमती ४०,००० /- रू. ची ६) लाल काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी गाडी क्र. एम.एच. ४९ ए. ए. २४८७ किंमती २०,००० /- रू. ची ७) काळ्या रंगाची अॅक्टीव्हा मोपेड दुचाकी गाडी क्र. एम.एच. ४९ ए. जि. ८६५५ किंमती २५,०००/- रू. ची ८) काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो दुचाकी गाडी क्र.एम.एच. ४९ ए.एन. १३१९ किंमती ४०,००० /- रू. ची असे एकुण ०८ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.आरोपीचे ताब्यातुन आठही वाहने किंमती एकुण २,४०,००० /- रू. आणण्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त,डॅा रविंद्र सिंघल, सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त(दक्षिण प्रभाग) शिवाजीराव राठोड,पोलिस उप आयुक्त (परि. ४)विजयकांत सागर,सहायक पोलिस आयुक्त (अजनी विभाग)विनायक कोते,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, पोउपनि माधव गुंडेकर, पोहवा. गणेश बोंदरे, आशिष तितरमारे,चंद्रशेखर कौरती, नापोअ. राजेश मोते, मुकेश कन्हाके, पोशि राजेश धोपटे, मयुर सातपुते, मपोहवा. रूबिना खान, शारदा बेहरे, सपना बांते व वंदना काटोले यांनी केली.