ॲापरेशन थंडर अंतर्गत कळमणा पोलिसांची मोठी कार्यवाही,१०८ किलो गांजा केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ऑपरेशन थंडर अंतर्गत कळमना पोलिसांची अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कार्यवाही शहरात येणारी एकूण १०८ किलोग्रॅम गांजाची खेप पकडली,२ आरोपी ताब्यात….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंघल यांचे मार्गदर्शनात नागपुर शहरात ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन आरोपींचा शोध घेवुन कार्यवाही करण्यात येत आहे.वरीष्ठांचे मार्गदर्शनामध्ये पोलिस स्टेशन कळमनाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण काळे, तपास पथक प्रमुख संतोषकुमार रामलोड आणि तपास पथकातील अंमलदार पोहवा रविकुमार शाहु, पोहवा प्रदिप पवार, पोशि मंगेश लोही, संदिप ढाले,संतोष पांडे यांनी दि ०३ जुन २०२५ रोजी मध्यरात्री ००:४५ वाजता चे सुमारास पोशि मंगेश लोही यांना मिळालेल्या खात्रीशीर खब-या मार्फत एक आयचर सहा चाकी ट्रक क्रमांक एम.एच. ४० वाय ९९६२ हा आपल्या ट्रक मध्ये जबलपुर येथुन गांजाची खेप घेवुन एच. बी. टाउन येथुन यशोधरानगर हददीमध्ये येणार आहे अशी माहिती मिळाली.





सदरची माहिती वरिष्ठांना दिली असता वरिष्ठांनी एन.डी.पी.एस. कायदयाअंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचे दोन टिम तयार करून एक टिम एच. बी. टाउन चौक येथे ब्रिजचे खाली व दुसरी टिम चिखली चैक येथे सापळा रचुन रोडने येणारे जाणरे वाहनावर देखरेख करून सदर ट्रक क्रमांकाचा शोध घेत होते. दुपारी २.०० वा चे सुमारास खात्रीशीर माहिती मिळाली की एम. एच. ४० वाय ९९६२ क्रमांकाचा ट्रक हा अंदाजे वेळ ४:०० वाजता ते ५ :०० वाजता दरम्यान जबलपुर हायवे रोडने कळमना हददीत येणार आहे. तेव्हा वरिष्ठांचे परवानगीने शासकीय पंच आणि सोबत पोलिस स्टाफ तसेच तपासाचे साहित्य ईलेक्ट्रीक वनज काटा, लॅपटॉप प्रिंटर सह पोलिस ठाणे हददीत चिखली चौक या ठिकाणी सापळा रचुन नमुद क्रमांकाचा आयचर सहा चाकी ट्रक क्रमांक एम. एच. ४० वाय ९९६२ चा शोध घेत असता एक टिम चिखली चौक ते एच. बी. टाउन चौक परिसरात पेट्रोलींग करित असतांना चिखली चौक येथुन काही अंतरावर काली माता मंदिर जवळ गुप्त बातमीदाराने दिलेला ट्रक क्रमांक एम. एच. ४० वाय ९९६२ हा सार्वजनीक रोडवर उभा दिसुन आला. तसेच त्या ठिकाणी दोन इसम हे सदर ट्रक मधुन काही पोते हे त्याचे मागे उभी असलेली काळया रंगाची महिन्द्रा एक्स. यु.वी. ५०० एम.एच. ३१ ई.के. ५२३२ मध्ये टाकतांना दिसून आले. तेव्हा लगेच सोबत स्टाफ सह उभ्या असलेल्या आयचर ट्रक आणि महिन्द्रा एक्स.यु.वी. ५०० कारजवळ जात असतांना दोन्ही इसम हे त्यांचे ताब्यातील चारचाकी वाहने घेवुन पळुन जात असतांना त्यांना सोबत स्टाफच्या मदतीने वाहने थांबविले. तेव्हा पंचासमक्ष यातील आरोपींना ताब्यात घेवुन पंचासमक्ष एन.डी.पी.एस. कायदयाअंतर्गत आरोपीतांकडुन सहा पोत्यातील एकुण १०८.००७ किलोग्रॅम झाडपत्ती सारखा हिरवट काळसर बिजा असलेला व पिवळसर रंगाचा उग्र वास येणारा ओलसर गांजा एकुण कि २७,००,०००/- रू चा मुददेमाल आणि आरोपी अविनाश संजय ढोके याचे ताब्यातील वाहन आयचर सहा चाकी ट्रक एम.एच. ४० वाय ९९६२ किमंत अदाजे १०,००,०००/- रू, ३) आरोपी पलाश विदयाधर वानखेडे याचे ताब्यातील वाहन काळया रंगाची महिन्द्रा एक्स.यु.वी. ५०० एम.एच. ३१ ई.के. ५२३२ किमंत अंदाजे ६,००,०००/- रू असा एकुण ४३,००,०००/- रू चा मुददेमाल हा घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून सरकारतर्फे  फिर्यादी पो हवा प्रदिप पवार  पोलिस स्टेशन कळमना नागपुर शहर.यांचे रिपोर्टवरून अप, क ४६८/२०२५ कलम ८ (क), २० (द), दोन (क)एन.डी.पी. एस. कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नमुद गुन्हयातील आरोपींकडुन व्यापारी मात्रामध्ये अंमली पदार्थ गांजा एकुण १०८ किलोग्रॅम मिळुन आलेला असुन त्यांना अटक करण्यात आली यामध्ये नागपुर शहर तसेच बाहेरील राज्यातील आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असुन गुन्हयाचा तपास सुरू आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल यांचे आदेशाने ऑपरेशन थंडर अंतर्गत अपर पोलिस आयुक्त( उत्तर विभाग) राजेन्द्र दाबाडे, पोलिस उपायुक्त (परीमंडळ ५) निकेतन कदम. पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा (डिटेक्शन) राहुल माखणीकर  सहा पोलिस आयुक्त( कामठी विभाग) विशाल क्षीरसागर यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन कळमना चे वपोनि प्रविण काळे, तपास पथक प्रमुख पोउपनि संतोषकुमार रामलोड, तपास पथकातील  पोहवा रविकुमार शाहु, प्रदिप पवार,पोशि मंगेश लोही, संदिप काले, संतोष पांडे तसेच पोलिस उपायुक्त, परिमंडळ कमांक ०५, सायबरचे पोशि  सचिन टांगले, आशिष पिपरहेटे यांनी केली.



 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!