वाहनचोरी व घरफोडीचे ५ गुन्हे उघड,गुन्हे शाखा युनिट ४ ची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक,नागपुर गुन्हे शाखा, युनिट क्र ४, ची कामगीरी, एकुण ०५ गुन्हे केले उघड…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २३/१२/२०२३ चे ०८.०० वा. ते दिनांक २६/१२/२०२३ चे ०७.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. २०० /२ सोमवारी क्वॉर्टर, शहीद शाहु गार्डन जवळ राहणारे फिर्यादी मुकेश केदारनथ
शाहु, वय ४६ वर्षे, हे आपले घराचे मुख्य दाराला कुलुप लावुन कुटंबासह उज्जैन येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दाराचे लॉक तोडुन, घरात प्रवेश करून, घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख १५,०००/-रू. असा एकुण २८,३००/ – रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन,सक्करदरा येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५७, ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचा समांतर तपासात पोलिस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट क्र ४ करीत असतांना युनिट ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान संशयावरून दोन मोपेडवरून जाणाऱ्या आरोपी क्र १) पियुष राजेश शाहु, वय १९ वर्षे रा. चंदन नगर, ईमामवाडा,
नागपुर





२) नयन नवनाथ चवरे वय २३ वर्षे, रा. पाचनल चौक, ईमामवाडा, नागपुर



३) साहील राजेश ऊके, वय २०वर्षे, रा. कामगार भवन मागे, रामबाग, नागपुर



व विधीसंघर्षीत बालक यांना मोपेडसह ताब्यात घेवून, त्यांची सखोल विचारपूस केली असता, विधीसंघर्षेीत बालकाने नमुद दोन्ही वाहने पोलिस ठाणे बेलतरोडी व पाचपावली हद्दीतुन त्याचा साथीदार फरार आरोपी साहील राजेश ऊके सह चोरी केल्याचे सांगीतले. तसेच त्या वाहनावरून आरोपी क्र १) व २ तसेच फरार आरोपी क्र १) आयुष लखोटे, वय १९ वर्षे, रा. ईमामवाडा नाल्याजवळ, नागपुर २) अमन वय १९ वर्षे, रा. दहीकर झेंडा, ईमामवाडा, नागपुर ३) ऋषी वय २० वर्षे, रा. उंटखाना, नागपुर यांनी पोलिस ठाणे सक्करदरा येथील वर नमुद घरफोडी तसेच ईतर एक घरफोडीचा गुन्हा आणि पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत एक असे
०३ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींकडुन गुन्हयात चोरी केलेल्या अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम. एच. ३१ डि.व्ही. ३२५८ आणि एम. एच. ४९ आर. ८८६९, व एच. पी. कंपनीचा लॅपटॉप, ओप्पो मोबाईल फोन, चांदीचे दागिने एकुण २८० ग्रॅम व रोख २,००० / – रू. असा एकुण किंमती १,७९,९००/–रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींना पुढील तपासकामी मुद्देमालासह सक्करदरा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची  कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त (गुन्हे) सुदर्शन मुमाक्का यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  शाम सोनटक्के, सपोनि अयुब
संदे, पोउपनि. अविनाश जायभाये, पोहवा. सुनिल ठवकार, नाजीर शेख, युवानंद कडु, पुरुषोत्तम जगनाडे, देवेंद्र नवघरे, अतुल चाटे, आशिष क्षिरसागर, नापोशि. चेतन पाटील, चेतन गेडाम, नरेंद्र बांते, पोअं. स्वप्नील अमृतकर, सतेंद्र यादव यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!