फसवनुकीच्या गुन्ह्यांत फिर्यादी व साक्षीदारच निघाले आरोपी,आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नोकरीच्या नावाखाली फसवणू्कीच्या गुन्ह्यातील आरोपी नागपूर आर्थिक  गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – फसवणू्कीच्या गुन्ह्यात फिर्यादी आणि साक्षीदार हेच आरोपी निघाले आहेत. या दोघांना नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक करून ५ कोटी ३१ लाख रु च्या  फसवणूकीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. १) अश्विन अरविंद वानखेडे (वय ३२ वर्ष), व्यवसाय खासगी इवेंन्ट, रा.फ्लॅट क्र.१०१, एकदंत अपार्टमेन्ट, जय दुर्गा सोसायटी ०१, मनिषनगर, नागपूर,:२) चेतन कृष्णराव भोसले, (वय ३० वर्षे), धंदा.खासगी रा.ठी. प्लॉट नं. १० आरती अर्पाटमेंट दतात्रय नगर, सक्करदरा पाण्याची टाकी, नागपुर, या पूर्वी अटक आरोपी ३) ओंकार महेन्द्र तलमले, (वय २६ वर्ष), रा. स्मृती ले आउट, नामदेव लॉन चे बाजुला, दत्तवाडी, पो. ठाणे वाडी, नागपूर अशी आरोपींच नावे आहेत.





या बाबत अधिक माहिती अशी आहे की, यातील माधव नगर ,ॲक्सीस बॅंकेचे वर,बजाजनगर नागपुर  येथे यातील फिर्यादी  अश्विन अरविंद वानखेडे यांचे तक्रारीवरून यातील आरोपी ओंकार महेंद्र तलमले याचे विरूध्द पो. ठाणे बजाज नगर येथे अप.क्र. २४३/२०२३ कलम ४२०,४०६,४६५,४६८,४७१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. नमूद गुन्हयातील आरोपी ओंकार याने फिर्यादी व एकूण १११ साक्षीदार यांना त्याचे कार्यालय अॅक्सिस बँकेच्या वर, माधव नगर शाखा, माटे चौक, नागपूर येथे ऑफिसमध्ये तसेच वरील पत्त्यावरील त्याच्या अॅक्सिस बँक खात्यामध्ये व इतर बँक खाते व रोख रक्कम स्वरूपात एकुण रक्कम ५,३१,७०,०००/- रू. घेऊन रिजनल रिमोट सेंसींग सेंटर, वाडी, नागपूर (NASA) येथे ऑफिस स्टाफ (क्लास बी), ऑफिस अॅडमीण, सिनीअर अॅडमीण या पदावर सरकारी नोकरी लावुन देतो, असे खोटे आमिष दाखवून फिर्यादी व साक्षीदारांना खोटे अपॉइंटमेंट लेटर आणि मेल पाठवून त्यांना नोकरी न लावता तसेच त्यांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. सदरहू प्रकरणात सखोल तपास केल्यास आरोपीने मोठ्या प्रमाणात अपहार केला. नमूद गुन्हयाचा सखोल तपास केला असता नमूद गुन्हयातील फिर्यादी अश्विन वानखेडे व साक्षीदार चेतन भोसले यांनी गुन्हयातील अटक मुख्य आरोपी ओंकार तलमले यांचे सोबत संगणमत करून नमूद गुन्हा केल्याचे व त्यांचा नमूद गुन्हयात सहभाग असल्यााचे तपासात निष्पन्न झाल्याने अश्विन अरविंद वानखेडे व चेतन कृष्णराव भोसले यांची नमूद गुन्हयात आरोपी म्हणून वाढ करून त्यांना (दि.१४ सप्टेंबर) रोजी अटक करण्यात आली आहे.



आरोपी अश्विन अरविंद वानखेडे याने त्याचे बँक खात्यात गुन्हयातील साक्षीदार यांचे कडून एकूण 2,47,28,544.73/- (दोन करोड सत्तेचाळीस लाख आठ्ठावीस लाख पाचशे चैरेच्याळीस) रूपये स्विकारले आहे. तसेच आरोपी चेतन भोसले याने त्याचे बँक खात्यात गुन्हयातील साक्षीदार यांचे कडून एकूण 1,00,00,000/- (एक करोड) रूपये स्विकारले आहे.नमूद दोन्ही आरोपीतांना अटक करून न्यायालया समक्ष हजर करून त्यांचा (दि.२०सप्टेंबर) रोजी पावेतो एकून ६ दिवस पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला आहे.



सदरची कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सागर आव्हाड, पोहवा पंढरी खोंडे, पो. शि. रविंद्र जाधव व मपोशि अविक्षणी भगत यांनी पुर्ण केली असून पूढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, करीत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!