नागपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई: वाहनचोरीचे २ गुन्हे उघडकीस, २ आरोपींना अटक अन् ₹३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने धडक कारवाई करत वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून, या प्रकरणांत आरोपींना अटक केली आहे.

१. MIDC पोलीस ठाण्यातील गुन्हा (ऑटोरिक्षा चोरी)

  • घटना: २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:०० वा. ते २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०७:०० वा. दरम्यान सरोदी मोहल्ला (हिंगणा रोड) येथील रहिवासी तक्रारदार रोहीदास प्रभाकर कोटे (वय ३५ वर्ष) यांची १,३०,००० रुपये किमतीची बजाज कंपनीची तीनचाकी ऑटोरिक्षा (क्रमांक MH 49 AR 0775) राहत्या घरासमोरून अज्ञात चोराने पळवून नेली होती.



  • कारवाई: MIDC पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपी निलेश उर्फ निलु राजेंद्र सोनवणे (वय २६ वर्ष, रा. कालीमाता मंदिरासमोर, लक्ष्मीनगर, मानकापूर, नागपूर) याला ताब्यात घेतले.

  • जप्ती: चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला असून, त्याच्याकडून चोरीचा १,३०,००० रुपये किमतीचा ऑटोरिक्षा जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला MIDC पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



२. शांतीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा (रॉयल एनफिल्ड दुचाकी चोरी)

  • घटना: २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:०० वा. ते २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०६:०० वा. दरम्यान व्ही.एच.बी. कॉलनी (शांतीनगर) येथील रहिवासी तक्रारदार अंश अजय बैस (वय २२ वर्ष) यांची १,७५,००० रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड दुचाकी (क्रमांक MH 40 BZ 3778) घरासमोरून चोरीला गेली होती.

  • कारवाई: शांतीनगर पोलिसांत कलम ३०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेने मुख्य आरोपी विनोद उर्फ गद्दु राजु लांजेवार (वय २६ वर्ष, रा. कौशल नगर, पिवळी नदी, कामठी रोड, नागपूर) याला ताब्यात घेतले.



  • सहआरोपी: चौकशीत त्याने आपले साथीदार विक्की योगेश डेहेरीया (वय २२ वर्ष, रा. इंदारामता नगर, यशोधरानगर) आणि पियुष दिपक निमजे (वय १८ वर्ष, रा. धम्मदीप नगर, यशोधरानगर) यांच्यासह संगनमत करून चोरी केल्याचे कबूल केले.

  • जप्ती: पोलिसांनी १,७५,००० रुपये किमतीची दुचाकी जप्त करून मुख्य आरोपीला शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.



तपास पथक:

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रविंद्र नाईकवाड, पोहवा. विलास कोकाटे, रोशन तिवारी, अजय शुक्ला, सचिन बढीये, नितीन वर्मा, पोअं. राहुल कुसरामे व अभय ढोणे यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!