बनावट देशी दारु कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ लाखाचा मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बनावट देशी दारू तयार करण्याच्या  कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, ११ लाख ८२ हजार, ५२० रू मुद्देमाल जप्त, २ आरोपींना घेतले ताब्यात….

कोंढाळी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण घटकातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील अवैघ धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने दि १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, पंकज कुमार बैचेन सिंग, रा. भानेगाव हा त्याचे शेती व्यवसायाचे आड कोंढाळी हद्दीतील मौजा मरगसुर शेत शिवारात अवैधरीत्या, विनापरवाना बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवुन बनावट देशी दारू तयार करीत आहे.





अशा माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणावर आरोपी क्र १ मिथुन महादेव शहा, वय ३७वर्षे, रा. चणकापुर २) पंकज कुमार बैचेन सिंग रा. भानेगाव हा जागीच मिळुन आले. आरोपीच्या ताब्यातुन १) २ बॉटल कॅप सिलींग मशीन १,५०,०००/- रूपये, २) १६ बॉक्स ज्यामध्ये बनावट देशी दारूच्या १६०० नग ९० एमएल च्या बॉटल किंमती ५६,०००/- रूपये, ३) २०० लीटरचे प्लॅस्टीक ड्रम ज्यामध्ये स्पीरीट द्रव पदार्थ भरून असलेले किंमती ६०,०००/-रूपये, ४) ६ खरड्याचे बॉक्स ज्यामध्ये बनावट देशी दारूच्या ७५० नग ९० एमएल च्या बॉटल किंमती २२,५००/- रूपये ५) दोन प्लास्टो कंपनीची टाक्या १००० लीटरच्या त्यात २,००० लीटर आरो फिल्टर बॉटर स्पीरीट लिक्यीड आरटीफीशिअल फ्लेवरिंग कम्पाउन्ड लिक्वीड असे मिक्स असलेले किमती ६,६०,०००/- रूपये, ६) १ व्ही गार्ड कंपनीचे टिल्लु पंपं किमती २५००/- रूपये, ७) १२ नग प्लॅस्टीक कॅरेट किमती ४५००/- रूपये, ८) १२ खरडयाचे बॉक्स मध्ये १०,००० नग याप्रमाणे १,२०,००० नग जर्मनी झाकण किंमती १,२०,०००/- रूपये ९) १८० रिकामे खरडयाचे बॉक्स ज्यावर रॉकेट देशीदारू प्रवरा डिस्टीलरी प.डॉ.वि.पा.स.सा.का.लि प्रवरानगर जि. अहमदनगर महाराष्ट्र असे लाल रंगामध्ये प्रिन्ट असलेले किमती ३०००/- रूपये, १०) ३० नग रॉकेट देशीदारू प्रवरा डिस्टीलरी प.डॉ.वि.पा. स.सा.का.लि. प्रवरानगर जि अहमदनगर महाराष्ट्र बँच न. ३३५ जानेवारी २०२५ असे लेबल बंडल प्रत्येकी ४,५००/- रूपये, ११) २४ बॉक्स मध्ये इंटरनॅशन फ्लेवर अॅन्ड फ्रेग्नस इंडीया प्रा. लि. कंपनीचे आरटीफीशिअल ऑरेन्ज फ्लेवरिंग कम्पाउन्ड लिक्वीड भरून असलेले किमती ९१२०/- रूपये १२) ०७ नग निळया रंगांचे ड्रम प्रत्येकी किंमती ७०००/- रूपये तसेच टेप, द्रवमोजण्याचे साहीत्यथर्मामीटर इनर्वटर, लेबल व इतर साहीत्या सह एक हिरोहोन्डा कंपनीची स्प्लेन्डर मोटर सायकल जुनी वापरती क. एम.एच ३१ बी जी ००९७ किमती २०,०००/ रूपये असा एकुण ११,८२,५२० रूपयांचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला



यावरुन पोलिस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी १). मिथुन महादेव शहा, वय ३७ वर्षे, रा.चणकापुर २). पंकज कुमार बैचेन सिंग रा.भानेगाव, पाहिजे आरोपी ३). विशाल शंभू मंडल, रा.चनकापुर, ४. राजेंद्र यादव रा. चनकापुर, ५. सागर सिंग रा. तळेगाव यांच्यावर कलम १२३,३१८(४),३३८,३४०,३(५) भा.न्या.सं सह कलम ६५ (अ) (ब) (क) (ड) (फ), ६७ (१) (अ)६७ (क),७२,८३,८६,९० मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने २ आरोपीसह सह मुददेमाल कोढांळी पोलीसांना सुपुर्द केला. दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास कोंढाळी पोलीस करीत आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी किशोर शेरकी, मनोज गदादे, जीवन राजगुरू,आशिष ठाकूर,पो हवा प्रमोद तभाने,
संजय बांते,इकबाल शेख,प्रमोद भोयर,वीरू नरड,बंटी वानखेडे
सायबर सेल चे सतीश राठोड,चा पो.हवा राहुल पाटील,चापोशि सुमित बांगडे यांनी पार पाडली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!