नागपुर स्थानिक गुन्हे शाखेचा रामटेक हद्दीत अवैध कुंटणखाण्यावर छापा…
स्थानिक गुन्हे शाखेने रामटेक हद्दीत नंदरधन येथील हॉटेलमधे सुरु असलेल्या अवैध कुंटनखाण्यावर छापा हॅाटेलचा चालक व मालकाविरूध्द कारवाई…..
रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामटेक हद्दीतील मौजा नगरधन गावाजवळ हॉटेल ऑल इज वेलकम चा मालक/मॅनेजर मोनु यादव हा त्याचे हॉटेल मध्ये येणारे गि-हाईकांकरीता बाहेरून महीला बोलावुन गि-हाईक लोकांकडुन पैसे घेवुन लपुन छपुन कुंटनखाना चालवुन अवैध देहव्यापार चालवित आहे.
अश्या गुप्त मुखबीरद्वारे मिळालेल्या खबरेची माहीती पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार (भापोसे), यांना दिल्याने त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्याचे आदेश दिले असता स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमुन तसेच बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा कारवाई केली असता वेलकम हॉटेल मध्ये अवैध वैश्या व्यवसाय संबंधाने सापळा रचुन बनावट ग्राहक यास हॉटेल मध्ये ग्राहक बनवुन त्यास त्या ठिकाणी शारीरीक सुखाकरीता महीला उपलब्ध करून देणा-या इसमासोबत सौदा करून ठरलेल्या सौदयाची रक्कम देवुन हॉटेल मध्ये पाठवुन कायदेशीर रेड केली असता हॉटेल वेलकम मालक सोनु गोपालसिंग यादव वय ३१ वर्ष रा कंटोमेन्ट एरीया कामठी जि नागपुर व मॅनेजर मोनु गोपालसिंग यादव वय २८ वर्ष रा कंटोमेन्ट एरीया कामठी जि नागपुर यांनी आपले हॉटेल मध्ये पाठविलेल्या बनावट ग्राहकाला रूम उपलब्ध करून देवुन प्रणय क्रियेकरीता (शारीरीक उपभोगाकरीता) वैश्या व्यवसाय करणारी स्त्री हीला पैश्याचे मोबदला घेवुन पुरविली असल्याने मौक्यावर जप्ती पंचनमा कारवाई करून आरोपी हॉटेल मालक सोनु यादव यांचे जवळुन रोख रक्कम २९,१००/- रू व एक मोबाईल फोन किमती १०,०००/- रू आरोपी हॉटेल मॅनेजर याचे जवळून बनावट ग्राहक याने दिलेल्या नगदी १०००/- रू नगदी ४०००/- व ड्राव्हर मधील २५०/- रू असा एकुण ५२५०/- रू व ३ मोबाईल फोन किमती ३०,०००/- रू व इतर साहीत्य तसेच पिडीता स्त्री कडुन एक मोबाईल किमती १०,०००/- रू व नगदी ३४३५०/- रू असा एकुण ८४४९०/- रू चे साहीत्य पिडीता कडुन जप्त करून ताब्यात घेतले.
यातील हॉटेल मालक आरोपी १) सोनु गोपालसिंग यादव वय २८ वर्ष रा कामठी जि नागपुर २) हॉटेल मॅनेजर नामे- मोनु गोपालसिंग यादव वय २८ वर्ष रा कामठी जि नागपूर यांनी स्वताचे आर्थीक फायद्याकरीता संगणमताने वेलकम हॉटेल येथे अवैधरित्या देह व्यापार चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरूध्द कलम ३,४,५ महीला औनतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि मनोज गदादे, जिवन राजगुरू, पोहवा संजय बांते, दिनेश आधापुरे, आशिष भुरे,नापोशि विरेंद्र नरड, विपीन गायधने, मपोहवा नितु रामटेके, चालक पोहवा अमोल कुथे, सूमित बांगडे यांनी पार पाडली.