
अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे मौदा पोलिसांचे ताब्यात,३५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
मौदा पोलीसांची रेती चोरीवर मोठी कार्यवाही….
मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(30) सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजता चे दरम्यान पोलिस स्टेशन मौदा येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार राजेंन्द्र गौतम यांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की एका 16 चक्का ट्रकमधुन रेतीची अवैधरित्या वाहतुक करणार आहे


अशा माहीती वरुण पोलीस हवालदार राजेंन्द्र गौतम यांनी कोणताही विलंब न करता सदर माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलीस ठाणे मौदा यांना. त्वरीत देवुन त्यांचे मार्गदर्शना प्रमाणे सोबत असलेले कर्मचारी सह माथनी टोल नाका नाकाबंदी करुण रात्री 11.00 वाजता दरम्यान 16 चक्का ट्रक क्रमांक MH-27-BX-7762 यास थांबवुन ट्रक चालकास ट्रक मध्ये भरलेल्या रेती बाबत रॉयल्टी विचारली असता नसल्याचे सांगितल्याने पोलिस हवालदार राजेंन्द्र गौतम ट्रक चा जप्ती पंचनामा तयार करुन 16 चक्का ट्रक क्रमांक MH-27-BX-7762 मध्ये 06 ब्रास रेती कींमत 30,000/- रु तसेच ट्रक कींमती 35,00,000/- लाख रुपये असा एकुन 35,30,000 रुपयाचा चा माल जप्त करुन पोलीस स्टेशन येथे आणला

पोलीस अमंलदार अतुल निंबार्ते यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस ठाणे मौदा येथे 16 चक्का ट्रक क्रमांक MH-27-BX-7762 चालक शिवाजी दत्तात्रय दराडे वय 38 वर्ष रा. बदनापुर जि. जालना व ट्रक मालक रुपेश सत्यनारायन रॉय रा. वार्ड नंबर 9 चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती यांचे विरोधात कलम 303 (2), 49 भारतीय न्याय सहिता 2023 सहकलम 48 (7), 48 (8) महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम, तसेच कलम 4,21 खाणी व खनिजे (विकास आणि नियमन) अधिनीय 1957 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष ए पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,कामठी संतोष गायकवाड,वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलीस ठाणे मौदा यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंन्द्र गौतम पोलीस अमंलदार अतुल निंबार्ते पोलीस अमंलदार शुभम ईश्वरकर, प्रणय बनाफर पोलीस ठाणे मौदा यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास सुरु आहे.


