अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने मोचारसायकल चोरीचे तीन गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने त्यासंदर्भात गंभीर विचार करुन सदरचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते





त्याअनुषंगाने  पोलिस स्टेशन खापरखेडा येथील  डी. बी. पथक पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना माहीती मिळाली की परीसरातुन चोरी गेलेल्या मोटारसायकल ची चोरी  १) कैलास हरिचंद्र तांडेकर वय ३२ वर्ष, २) आकाश हरिचंद्र तांडेकर वय ३० वर्ष दोन्ही रा. विना संगम याने केल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ७ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या



तसेच  यांचेसोबत चोरी चे गुन्हयात सहभाग असलेला फरार आरोपी विजय उर्फ विक्की सुरेश तुरतर रा. कोराडी याला मध्यवर्ती कारागृह नागपुर येथुन ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्याने आणखी तिन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यामध्ये पोलिस स्टेशन खापरखेडा येथील २ मोटार सायकल व पोलिस स्टेशन कोराडी नागपुर शहर येथील १ मोटार सायकल जप्त केलेल्या आहे. पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी.बी. पथकाने दोन महिन्यात एकुण १० चोरीच्या मोटार
सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे.



सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलिस अधिकारी,कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक धनाजी जळक, पोउपनि आरती नरोटे, डी. बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, कैलास पवार, अनिल वाढीवे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!