अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्यास पोलिस अधीक्षकाचे पथकाने घेतले ताब्यात,२० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अवैधरित्या वाळुची(रेती) चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद करुन,वाहनासह एकुण २०२५०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त,पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही….

नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे उमरेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, एक इसम हा त्याचे मालकीच्या टिप्पर क्र. एम एच – ४९/ए टी- ६३०७ चा वापर करून मौजा मांगरूळ फाटा येथे रेती चोरी करून शासनाचा महसुल बुडवुन टिप्पर मध्ये लोड करून अवैधरीत्या वाहतूक करतो आहे





अशा खात्रीशीर बातमीवरून उमरेड येथील मौजा मांगरूळ फाटा येथे नाकाबंदी करीत असताना टिप्पर क्र. एम एच – ४९ / ए टी – ६३०७ चा चालक मच्छीद्र नरहरी गीरी, वय २७ वर्ष, रा. प्लॉट नं. १०१ लाल शाळेजवळ भांडेवाडी पारडी नागपुर यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता टिप्पर वाहनामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती मिळून आली



सदर टिप्पर चालकास टिप्पर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून एक पांढऱ्या निळया रंगाची टाटा कंपनीचा १० चक्का टिप्पर ज्याचा वाहन क्र. एम ४९ ए टी ६३०७ किंमती २००००० /- रू मध्ये ०५ ब्रास रेती प्रत्येकी ब्रास ५००० /- रू प्रमाणे २५०००/- असा एकुण २०२५०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी – १) मच्छिद्र नरहरी गीरी, वय २७ वर्ष, रा. प्लॉट नं. १०१ लाल शाळेजवळ भांडेवाडी पारडी नागपुर याने २) निलेश भाजीपालोरा खरबी चौक दिघोरी नागपुर_याचे सांगण्यावरून विनापरवाना रेती चोरी करून वाहतूक करताना मिळून आले.यावरुन सदर आरोपींविरुद्ध पोस्टे उमरेड येथे कलम ३७९, १०९, ३४ भा.द.वी. सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात
आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी, नापोशि प्रणय बनाफर पोशि बालाजी बारगुले, कार्तिक पुरी, विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!