रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चाकुचा धाक दाखवुन युवकास लुटणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण यांनी केले जेरबंद….

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ११/१२/२०२३ रोजी फिर्यादी  सागर चंद्रभान बाजनघाटे, वय २५ वर्षे, रा. सिरोंजी ता. सावनेर हा मोटारसायकल क्रमांक एम.एच.- ४० / बि. झेड -९२३२ या दुचाकी ने सावनेर वरुन खापा मार्गे बडेगांव रोडनी घरी जात असतांना दुपारी ०३/३० वा. सुमारास उमरी फाटयाचे समोर १०० मिटर अंतरावर दोन ईसमांनी फिर्यादीस हात दाखवुन थांबवुन  चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा वन प्लस नॉर्ड सीई–२ कंपनीचा मोबाईल फोन आणि बिएसएनएल कंपनीचा मोबाईल फोन व पॅकेट मधील १८७०/- रोख आणिआधार कार्ड असा मुद्देमाल
जबरीने हिसकावुन पळुन गेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खापा येथे अप. क्र. ५०७/२३ कलम३९२, ३४ भादवि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.





सदर घटने पासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. तेव्हापासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत होते. दि. ०९/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन  सावनेर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली की, सावनेर बस स्थानक जवळ दोन इसम चोरीचे साहित्य विकण्याकरीता आलेले असुन त्यांचे वर्तणुक संशयास्पद आहे. अशा माहितीवरून स्थानिक शाखेचे पथकाने सापळा रचुन दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने



१) प्रवीण प्रकाश गजभिये, वय २७ वर्ष, रा. चिचघाट, ता. जि. पांढुरणा मध्यप्रदेश



२) मच्छिंद्र व्यंकँटी कदम, वय ३९ वर्ष, रा. वार्ड न. २८ इंदिरा कॉलनी
शास्त्री वाढ पांढुर्णा जिल्हा पांढुणा मध्यप्रदेश

असे सांगितले. वरील नमुद दोन आरोपींची  अंगझडती घेतली
असता त्यांच्याकडे चोरीचे साहित्य मिळुन आले. त्याचे गुन्हे अभिलेखाशी पडताळणी केली असता ते पोलिस स्टेशन,खापा अप. क्र. ५०७/२३ कलम ३९२, ३४ भादवि या गुन्हयातील असल्याचे दिसुन आले. सदर गुन्हयाबाबत त्यांना विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. करीता नमुद दोन्ही आरोपीतांकडुन गुन्हयातील १) एक वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत २५,००० /- रुपये २) गुन्हयात वापरलेली एक होंडा शाईन कंपनीची दुचाकी वाहन विना क्रमांकाची किंमत ७५,००० /- रुपये ३) नगदी ५८० /- रुपये असा एकूण १,००,५८० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यातील मुद्देमाल, कागदपत्रे, २ आरोपी पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलिस स्टेशन खापा यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलिस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलिस हवालदार राजेंद्र रेवतकर, रोशन काळे, संजय बांते, आशिष मुंगळे, प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, किशोर वानखेडे, वीरेंद्र नरड, चालक पोलिस हवालदार अमोल कुथे, पोलिस नायक सतीश राठोड सायबर सेल ना. ग्रा. यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!