
सराईत गुन्हेगार प्रमोद साहनी यास नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले तडीपार…
नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कन्हान अंतर्गत येणाऱ्या खदान नं ०३ ता. पारशिवनी जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी वय २४ वर्ष रा. खदान नं ३, कन्हान जि. नागपूर याने पोलिस स्टेशन रामटेक व कन्हान परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे
वातावरण निर्माण केले होते. सदर सराईत अपराधी हा शरीराविरूध्द व मालमत्ते संबंधात गुन्हे करण्यात अग्रेसर असल्याने त्याचे या कृत्यामुळे सामान्य जनतेच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. अश्या या धोकादायक गुन्हेगारा विरूध्द नागपुर ग्रामीण पोलिसांनी बरेच वेळा प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. तसेच त्यांचे विरूध्द दाखल करण्यात आलेल्या गुन्हयात त्याला वारंवार अटक सुध्दा करण्यात आली. व त्याचे वर्तणुकीत सुधारणा व्हावी या हेतुने त्याला कारागृहातही पाठविण्यात आले होते परंतु कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्याचेमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. याउलट तो अधिक निडर व दुत्साही होत गेला. त्याने साथीदारासह दुखापत पोहचवुन शिवीगाळ करून
जिवे मारण्याची धमकी देणे, साथीदारासह जबरी चोरी करून ईच्छापुर्वक दुखापत पोहचविणे, घरफोडी करणे, जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे करत गेला. त्यामुळे परीसरात राहणाऱ्या नागरीकांमध्ये त्याची प्रचंड दहशत निर्माण झाली. यामुळे त्याचेवर नियंत्रण ठेवुन त्याचेवर प्रभावी कारवाई करणेकरीता नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष ए पोद्दार यांनी ठाणेदाराला कठोर व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रामटेकचे ठाणेदार यांनी सदर गुन्हेगाराविरूध्द एमपीडिए कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांना सादर केला. मा.जिल्हाधिकारी यांनी सदर सराईत गुन्हेगाराची वृत्ती व त्याने केलेले गुन्हे तसेच त्यांने कन्हान व रामटेक परीसरात
माजविलेली दहशत लक्षात घेता सदर गुन्हेगाराविरूध्द योग्य ती दखल घेवुन त्यास ०१ वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश दिल्याने सराईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी यास दिनांक २४/०९/२०२३ रोजी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, . हर्ष ए. पोद्दार, व अपर पोलिस अधीक्षक, डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस स्टेशन रामटेक येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, सहायक फौजदार सुरज परमार,
पोलिस हवालदार निलेश बर्वे, पोलिस अंमलदार होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.


