उच्चभ्रु वस्तीत घरफोडी करणारी टोळीस २४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुन्हे शाखा युनीट १ ने  उच्चभ्रु वस्तीत झालेल्या घरफोडीचा २४ तासाचे आत केला उलगडा, आंतरराज्यीय ०३ रेकॉर्ड वरील सराईतांची टोळी जेरबंद करून ५७,६६,२१० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनीत नवकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा तोडुन, दरवाजा उचकाटुन घरातील बेडरूममध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे दागिणे, रोख रूपये वगैरे असे घरफोडी चोरी करून चोरून नेले होते. त्यावरून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशन कडील । गुरनं २०९/२०२४ भा. न्या. सं. कलम ३३१(३), (४), ३०५ प्रमाणे फिर्याद दिली होती.सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त,(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे,. संदिप मिटके यांनी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.





त्यानुसार गुन्हेशाखा युनिट क्र १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपासा दरम्यान घटनास्थळास तात्काळ भेट दिली. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पोउनि चेतन श्रीवंत,पोलिस अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राम बर्डे यांचे पथकाने आरोपी ज्या दिशेने बाहेर पडतात. त्या परिसरातील विविध दुकान व शॉप येथील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून जवळ पास ५ ते ६ कि.मी ची सी.सी.टी.व्हि फुटेजची पाहणी करून आरोपी हे भिमवाडी गंजमाळ भागातील असुन त्याचे नावे निष्पन्न केली. पोहवा विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमी वरून माहिती मिळाली की, सदर घरफोडी चोरीचा गुन्हा हा गोरखसिंग टाक, दिपक जाधव, अमनसिंग टाक यांनी केला असुन ते सध्या भिमवाडी गंजमाळ, नाशिक या ठिकाणी मोटार सायकल क्रमांक एम.एच १५-जी.जी-०२५१ यावर फिरत असल्याची बातमी मिळाली.



सदरची बातमी गुन्हे शाखेचे वपोनि मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सपोनि  हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, श्रेणी पोउपनि रविंद्र बागुल, चालक श्रेणी पोउपनि किरण शिरसाठ, सफौ  सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, प्रशांत मरकड, संदिप भांड, रमेश कोळी, प्रदिप म्हसदे, महेश साळुंके, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, राजेश लोखंडे, चालक पोहवा/नाझीमखान पठाण, सुकाम पवार,नापोशि मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, पोशि आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, मपोशि अनुजा येलवे, चालक पोशि समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर परिसरात रवाना केले



नमुद पथकाने भिमवाडी गंजमाळ, नाशिक येथे सापळा लावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे मोटार सायकल क्रमांक एम.एच १५-जी.जी-०२५१ हीचे वरील १) गोरखसिंग गागासिंग टाक,वय-३५वर्षे, २) दिपक तुकाराम जाधव, वय-३३वर्षे, ३) अमनसिंग पंजाबसिंग टाक, वय-३०वर्षे सर्व राहणार भिमवाडी गंजमाळ नाशिक यांना पकडुन त्यांनी दिलेल्या कबुली वरून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन सदर आरोपी अमनसिंग पंजाबसिंग टाक व दिपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदना वरून गुन्हयातील गेला माल ५६, ३१,२१०/-रूपये किंमतीचे ८६६.३४० ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिणे व लगड हस्तगत करण्यात आली आहे

तसेच नमुद आरोपींचे ताब्यातुन ०३ मोबाईल फोन व यामाहा एफ. झेड मोटार सायकल, ८६६.३४० ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिणे व सोन्याच्या लगड असा एकुण ५७,६६,२१०/- रूपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच नमुद आरोपींनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल ही सुमारे २ ते ३ दिवसापुर्वी श्रीलक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्कीगमधुन, इंदिरानगर परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. तरी आरोपींना पुढील तपासकामी सरकारवाडा पोलिस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हेशाखा), संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक  मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, श्रेणी पोउपनि रविंद्र बागुल, सफौ सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, प्रशांत मरकड, संदिप भांड, रमेश कोळी, प्रदिप म्हसदे, महेश साळुंके, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, राजेश लोखंडे, नापोशि मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, पोशि आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, मपोशि अनुजा येलवे चालक श्रेणी पोउपनि किरण शिरसाठ, चालक पोहवा नाझीमखान पठाण, चालक पोहवा सुकाम पवार, चापोशि समाधान पवार यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!