कापडाचे शोरुम मधे चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कपडयाच्या शोरूममधुन जबरीने कपडे चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार युनीट १ ने केले जेरबंद….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा,  संदिप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये जबरी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.





त्याअनुषंगाने दि.(१५) रोजी सरकारवाडा पोलिस स्टेशन येथील गुरनं. १५३ / २०२४ भादवि ३९२, ३४ प्रमाणे दाखल होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपासा दरम्यान गुन्हेशाखा युनिट १ च्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सीसीटीव्ही मध्ये दिसुन आलेले दोन इसम यांची ओळख  पटवुन त्यांचे नाव निष्पन्न केले दि. १५/०६/२०२४ रोजी सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांन पोहवा  विशाल काठे व नापोशी प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा मौहमंद सैय्यद याने केला असुन तो पखालरोड भागात फिरत आहे.



सदरची बातमी युनीट १ चे वपोनि  मधुकर कड यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि  रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे,  प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, नापोशि विशाल देवरे प्रशांत मरकड, चापोशि समाधान पवार अशांनी पखालरोड या भागात सापळा लावुन मौहमंद अन्वर सैय्यद वय-२९ वर्षे, राह. नानवली, फेमस
बेकरीच्यामागे, प्रज्ञानगर, भद्रकाली, नाशिक यास शिताफिने ताब्यात घेऊन त्यास गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देउन, १७,७००/- रूपये किंमतीचे त्यात ५ शर्ट, ४ पॅन्ट, १ टिशर्ट व एक बरमुडा पॅन्ट असे काढुन दिल्याने ते  जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी प्रविण उर्फ चापा काळे याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो आम्रपाली झोपडपट्टी कॅनाल रोड, नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा त्या भागात जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव प्रविण उर्फ चापा लिंबाजी काळे वय २४ वर्षे, रा. आम्रपाली झोपडपटटी, कॅनलरोड, नाशिक असे सांगितले यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता गुन्हयाची कबुली दिली आहे. तरी वरील दोन्ही आरोपींनी वैद्यकिय तपासणी करून आरोपीना जप्त मुददेमालासह पुढील कारवाईकामी सरकारवाडा पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले



सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे पोलिस निरीक्षक. मधुकर कड,सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि रविंद्र बागुल,सफौ सुरेश माळोदे, पोहवा विशाल काठे, प्रदिप म्हसदे,
प्रविण वाघमारे, शरद सोनवणे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, नापेशि विशाल देवरे,पोशि जगेश्वर बोरसे, राम बर्डे चापोशि  समाधान पवार अशांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!