
अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोघे वाहनासह युनीट १ च्या ताब्यात….
अवैधपणे गुटखा वाहतुक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात,ट्रकसह ३० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरुन लपून प्रतिबंधीत असलेल्या अंमली पदार्थाची व तंबाखूची अवैधपणे विक्री करणारे इसमांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने दि. ०४/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनीट १, नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोहवा प्रदिप म्हसदे यांना गोपनीय माहीती मिळाली की, ट्रक क्रमांक एम.एच १२ एम. व्ही – ७५१० या मध्ये दोन इसम हे प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा ) गाडीमध्ये भरून अवैद्य विक्री करण्याच्या उद्देशाने पेठरोड कडुन भक्तीधामकडे ३:०० ते ४०० वा चे दरम्यान येणार असल्याची माहीती प्राप्त झाली होती. सदरची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक.मधुकर कड यांना कळविली असता, त्यांनी सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि गजानन इंगळे, रविंद्र बागुल, पोहवा प्रदिप म्हसदे, विशाल काठे,संदिप भांड, नाझीमखान पठाण,प्रविण वाघमारे, नापोपोशि प्रशांत मरकड,पोशि विलास चारोस्कर,जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड तसेच चापोशि समाधान पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने वरील नमुद पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मोती सुपर मार्केट समोर, पेठरोड पंचवटी येथे सापळा लावुन थांबले असतांना एक अशोक लेलॅंड भगवा व सफेद रंगाचे पट्टे असलेला ट्रक क्रमांक एम. एच १२ – एम. व्ही- ७५१० येतांना दिसला त्यास थांबवुन सदर ट्रकमधुन चालक व क्लिनर असे दोन इसम खाली उतरले असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारले वरुन त्यांनी त्यांचे नावे १) अमोल ज्ञानोबा इंगुळकर, वय – ३७वर्षे,धंदा चालक, रा- मु.पो कामथडी ता. भोर जि. पुणे, २) जाबीर अफजल बागवान, वय – ३६ वर्षे, धंदा- क्लीनर, रा- घर नं ५९
बुधवार पेठ, बाराटक्के चौक शेजारी, सातारा असे सांगितले. त्यांना सदर ट्रक मध्ये काय आहे बाबत विचारपुस केली असता त्यांनी ट्रक मध्ये हिरा पानमसाला व संगंधीत तंबाखु असल्याबाबत सांगितल्याने सदर ट्रकची झडती घेतली असता सदर ट्रकमध्ये विक्रीकरीता आणलेला एकुण १८, ५७, १२० /- रू किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा अशोक लेलॅड ट्रकमध्ये वाहतुक करतांना मिळुन आल्याने ट्रकसह एकुण ३०,०७,१२० /- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीतांविरूध्द पंचवटी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पंचवटी पोलिस ठाणे येथील सपोनि पडोळकर हे करीत आहेत…


सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त,गुन्हेशाखा,नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि गजानन इंगळे, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, प्रविण वाघमारे,नापोशि प्रशांत मरकड, विशाल देवरे,पोशि विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड, मपोशि अनुजा येलवे तसेच चापोशि समाधान पवार यांनी केली आहे.



