
MD ड्रगची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….
एमडी (मेफेड्रोन) ची चिल्लर विक्री करणारा गुन्हेशाखा युनिट – २ च्या जाळ्यात अडकला,MD सह आरोपी ताब्यात…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त गुन्हे, चंद्रकांत खांडवी,
सहा.पोलिस आयुक्त गुन्हे,. अंबादास भुसारे, नाशिक शहर यांनी एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक १८/०३/२०२४ रोजी पोलिस अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अश्विनी कॉलनी, सामनगावरोड, नाशिकरोड परिसरात राहणारा एक इसम
हा मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ग्राहकाचे शोधात असून तो आज दुपारी ३:३० वा चे सुमारास अंमली पदार्थ घेवून अश्विनी कॉलनी परिसर सामनगाव रोड, नाशिकरोड येथे
येणार आहे. गुन्हे शाखा युनिट – २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांचे नेतृत्वाखाली सापळा लावला असता किरण चंदु चव्हाण, वय २३ वर्षे, रा. ठि. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड,
नाशिकरोड हा त्याचे कब्जात १९.३९ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रोन (एमडी) हा ५८१७० /- रु. किंमतीचा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने वजनकाटयासह बाळगतांना मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह
ताब्यात घेवून नाशिकरोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, चंद्रकांत खांडवी, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, नाशिक, अंबादास भुसारे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदशनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलिस
निरीक्षक सचिन जाधव, सपोउनि / विवेक पाठक, पोहवा मनोहर शिंदे स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, तेजस मते, पोहवा संजय सानप, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, मधुकर साबळे, अतुल पाटील, संजय पोटींदे, जितेंद्र वजिरे, पोलिस फोटोग्राफर रोहित आहिरे सहा. रासायनिक विश्लेषक श्री. प्रविण वाल्मीक मोरे व त्यांचे पथक यांनी केलेली आहे.




