
अवैध प्राणघातक धारदार शस्त्रासह दोघांना युनीट १ ने घेतले ताब्यात…
प्राणघातक शस्त्रांसह दोन इसमांना युनीट १ ने केले जेरबंद….
नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
नाशिक लोकसभा – २०२४, आदर्श आचारसंहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या,


त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.त्याअनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असतांना दिनांक( १५) रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ मधील पो. हवा देविदास ठाकरे यांना गुप्त बातमीदारा
मार्फत बातमी मिळाली की, भाजी मार्केट, म्हसरूळ, दिंडोरी रोडवर दोन इसम २० ते २५ वयोगटातील असे दोघे जण कमरेला धारदार कोयते लावुन घेवुन मोटार सायकल वर फिरत असल्याची बातमी मिळाली, सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट – १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी पोउनि गजानन इंगळे, पो. हवा देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, पोशि विलास चारोस्कर, अमोल कोष्टी,आप्पा पानवळ, राजेश राठोड, चालक सपोउनि किरण शिरसाठ, पोहवा नाझीम पठाण,यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमुद पथकाने भाजी मार्केट, म्हसरूळ, दिंडोरी रोडवर नाशिक येथे सापळा लावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे ०२ इसम नामे १) धनराज गोकुळ लांडे रा. मखमलाबाद लिंक रोड, म्हसरूळ, नाशिक २) हर्षल राजु मोंढे रा. दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक यांना त्यांचे ताब्यातील यामाहा आर वन फाईव्ह मोटार सायकल जीचा क्रमांक एम एच १५जे के ६५९८ हीचे सह ०३ लोखंडी कोयते व ०१ चाकु असा ८३,५००/- रूपयांचा माल हस्तगत
करण्यात आला आहे. सदर इसमां विरुध्द म्हसरूळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असुन ०२ आरोपी इसम व जप्त मुददेमाल पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, सफौ वसंत पाडव, सुरेश माळोदे, पो.हवा देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, धनंजय शिन्दे, राजेश लोखंडे,पो.शि विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड, महेश साळुंके, राहुल पालखेडे, भोलासिंग परदेशी, चालक सफौ किरण शिरसाठ, समाधान पवार, पोहवा नाझीम पठाण, यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.



