अट्टल घरफोडी करणारा कुख्यात हसन कुट्टी व त्याच्या टोळीस स्थागुशा ने केले जेरबंद,१० गुन्हे केले उघड…
घरफोडया करणारी आंतरराज्यीय टोळी व अट्टल घरफोड्या हसन कुट्टी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीचे १० गुन्हे केले उघड…
नाशिक(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२४) रोजी मध्यरात्रीचे सुमारास इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरटयांनी हॉटेल साई प्लाझाचे किचनच्या खिडकीचे गज कापुन हॉटेलमध्ये प्रवेश केला व गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काऊंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकुण ०२ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेलेबाबत
इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुरनं ३८ / २०२४ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील दोन महिन्यांमध्ये इगतपुरी, घोटी परिसरात वरील घटनेप्रमाणेच हॉटेल्स, वाईन शॉप मध्ये घरफोडया करून मोठया प्रमाणात विदेशी मद्य चोरल्याप्रकरणी घरफोडीचे एकुण ०४ गुन्हे दाखल होते.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे मार्गदर्शन व सचूनांप्रमाणे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर तसेच उघड न झालेल्या गुन्हयांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांनी वरील घरफोडीचे गुन्हयांमधील आरोपींचे गुन्हा करण्याचे पध्दतीवरून माहिती घेतली असता,
नजीकचे कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामीनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी, वय ४५, रा. ओटवरम, बिल्कापुर, जि. मलपुरम, राज्य केरळ, हल्ली मु. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक यास सतत तीन दिवस-रात्र
पाळत ठेवून शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपीस वरील गुन्हयांचे तपासात विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचे नाशिक शहर व मालेगावातील साथीदार
१) हसन हमजा कुट्टी, वय ४५, रा. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, , पेठरोड, नाशिक, मुळ रा. केरळ
२) दिलीप रूमालसिंग जाधव, वय २३, रा. जेनेसीस पी.जी. फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश
३) अनिल छत्तरसिंग डावर, वय २६, रा. जेनेसीस पी.जी., फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश
४) मुस्तफा अब्दुल अन्सारी, वय २५, रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव नाशिक, मुळ रा. खेरखुंडा, झारखंड
५) सैय्यद इस्माईल सैय्यद जहुर, वय ४२, रा. अन्सारगंज, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक
६) सईद शेख मजिद उर्फ सईद बुडया, वय ३४, रा. जमहुर नगर, मालेगाव, जि. नाशिक
७) मोहम्मद अस्लम अब्दुल सत्तार, वय ३८, रा. अख्तराबाद, मालेगाव, जि. नाशिक
८) सैय्यद निजाम सैय्यद अन्चर, वय ४०, रा. आयशानगर, अनिस व्हिडीओ गल्ली, मालेगाव, जि. नाशिक
९) हनिफ खान इकबाल खान, वय ३२, रा. जमहूर कॉलनी, ६० फुटी रोड मालेगाव, जि. नाशिक
१०) शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग, वय २६, रा. नुमानीनगर, मालेगाव, जि. नाशिक
यांचे सोबत मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली वरील सर्व आरोपीना मालेगाव शहर व नाशिक शहरातील फुलेनगर पसिरातून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील गुन्हयांचे समांतर तपासात त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे
केल्याची कबुली दिली आहेत.
१) घोटी पो.स्टे. गुरनं ६२३ / २०२३, भादवि कलम ४५७,३८०
२) घोटी पो.स्टे. गुरनं ५७२ / २०२३, भादवि कलम ४५७,३८०
३) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३२ / २०२४, भादवि कलम ४५७,३८०
४) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३८ / २०२४, भादवि कलम ४५७,३८०
५) चाळीसगाव शहर पो.स्टे. जळगाव, गुरनं २० / २०२४, भादवि कलम ४५७,३८०
६) चाळीसगाव शहर पो.स्टे. जळगाव, गुरनं २५/२०२४ भादवि कलम ४५७,३८०
७) चाळीसगाव रोड पो.स्टे., धुळे, गुरनं २९/२०२४, भादवि कलम ४५७,३८०
८) राहुरी पो.स्टे., अहमदनगर, गुरनं २०२/२०२४, भादवि कलम ४५७,३८०
९) राहुरी पो.स्टे., अहमदनगर, गुरनं १९८/२०२४, भादवि कलम ३७९
१०) दिंडोरी पो.स्टे. गुरनं १०२ / २०२४ भादवि कलम ४५७,३८०
सदर गुन्हयांचा मास्टर माईंड हसन हमजा कुट्टी याचेवर घरफोडीचे एकुण ३२ गुन्हे दाखल असून त्यापैकी ०७ गुन्हयांमध्ये त्याला दोषसिध्दी झाली आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपी शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग हा मालेगावातील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर खुन, दरोडा, जबरीचोरी यासारखे गंभीर ०६ गुन्हे दाखल आहे. यातील ताब्यात घेतलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांचेवर दरोडा तयारी, घरफोडी, चोरी असे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी हसन कुट्टी याने मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटल्यावर त्याचे वरील साथीदारांसह घरफोडयांचे सत्र सुरू केले होते. यातील आरोपीतांनी कबुली दिलेवरून घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून सदर आरोपींनी वरील गुन्हयांमध्ये चोरून नेलेले विदेशी मद्य, मोटर सायकल, मोबाईल फोन तसेच आरोपींनी
गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा व इटियॉस कार आणि आरोपी हसन कुट्टी याने चोरीच्या पैशांतुन विकत घेतलेली मोपेड दुचाकी असा एकुण सुमारे १२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
वरील आरोपीतांना इगतपुरी, घोटी व दिंडोरी पोलिस ठाणेकडील गुन्हयांमध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू चालु आहे.नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणारे आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणलेले आहेत. सदर आरोपीतांकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि हेमंत पाटील, पोउनि संदिप पाटील, नाना शिरोळे, सपोउनि शिवाजी ठोंबरे, पोहवा चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, किशोर खराटे, हेमंत गरुड,
सतिष जगताप,नापोशि विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोशि योगेश कोळी,
दत्ता माळी तसेच विशेष पथकातील पोहवा संतोष हजारे, पोना विजय वाघ, सुनिल पाडवी, चंद्रकांत कदम यांचे पथकाने वरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.