
वाघाची शिकार करुन त्याची कातडी विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
वन्यप्राणी बिबटया वाघास ठार मारून, वाघाची कातडी विकणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….


नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगरद-या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात असते. अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही
संशयीत इसम हे अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार घोटी पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर गावचे शिवारातील मोराचे डोंगराचे पायथ्याची काही संशयीत इसम वन्यप्राणी बिबटया वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक १३/०३/२०२४ रोजी सकाळचे सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मोराचे डोंगराचे पायथ्याशी सापळा रचुन संशयीत
इसम नामे १) नामदेव दामु पिंगळे,२) संतोष सोमा जाखीरे ३) रविंद्र मंगळु आघाण ४)बहिरू उर्फ भाउसाहेब चिमा बेंडकोळी५)बाळु भगवान धोंडगे, यांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातील गोणपाटातून वन्यप्राणी वाघाची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. सदरची कातडी ही परिक्षणाकरीता जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय, नाशिक येथे पाठविली असता ती वन्यप्राणी बिबटया वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी यांचे पथक करीत आहे.
सदर बाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखीरे याचा साथीदार नामे सन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी वाघाची
कातडी पाहिजे होती असे सांगितले. त्यासाठी यातील आरोपी १) नामदेव दामु पिंगळे वय ३० वर्ष रा.पिंपळगाव मोर ता.ईगतपुरी हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे, सदर ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटर
सायकलच्या क्लजवायरचा गळफास तयार करून, पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबटया वाघास पकडून त्यास ठार मारले व त्यानंतर यातील त्याचे साथीदार आरोपी २) संतोष सोमा जाखीरे, वय ४०, रा. मोगरा, ता. इगतपुरी, ३) रविंद्र मंगळु आघाण, वय २७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी, ४)बहिरू उर्फ भाउसाहेब चिमा बेंडकोळी, वय ५०, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी, ५)बाळु भगवान धोंडगे, वय ३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी

या सर्व आरोपींनी मिळून बिबटया वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही सन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर प्रकरणातील संशयीत आरोपी सन्यासी दिलीप बाबा याचा पोलिस पथक शोध घेत आहे.

सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा संदिप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरूड, नापोशि विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांचे पथकाने केली आहे.


