रसायनांचा वापर करुन भेसळयुक्त दुध तयार करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचा छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

निफाड ः सवीस्तर व्रुत्त असे कीनिफाड तालुक्यातील बोकडदरे येथे भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचा छापा निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.
दिनांक १०/१०/२०२३ रोजी सकाळचे सुमारास निफाड पोलिस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात कातकाडे मळा परिसरात संशयीत इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे हा त्याचे राहते घरात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवित असल्याची गुप्त बातमी ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक  विशाल क्षीरसागर यांना मिळाली होती. सदर बातमी प्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. उमेश सुर्यवंशी व श्री. योगेश देशमुख यांचेसह सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता, त्याठिकाणी इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे, रा. बोकडदरे, कातकाडे मळा, ता. निफाड हा स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी दूधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण करतांना मिळून आला आहे. सदर ठिकाणाची पोलीसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याठिकाणी प्रभात मिल्क पावडर, मिल्की मिस्ट पावडर तसेच तेलयुक्त रसायन व पावडर मिश्रीत दूध असा एकूण ४८, १६४/- रूपये किंमतीचा साठा मिळून आला आहे. यातील इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वरील रासायनिक पदार्थांपासून भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करत असतांना आढळून आला आहे. सदर रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले दूध हे मानवी शरिरास घातक आहे व त्यामुळे मानवी शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे माहित असतांना देखील वरील इसम  अतुल कातकाडे व त्याचेसह घातक रसायन पुरवठा करणारे पुरवठादार व संगनमत असणारे इतर व्यक्ती
यांचेविरूध्द अन्न सुरक्षा अधिकारी श्री. उमेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (१), २६ (२) (i) शिक्षा कलम ५९ सह भादवि कलम ३२८,२७२, २७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शनानूसार विशेष पथकाचे पोलिस उपअधीक्षक विशाल
क्षीरसागर, पोहवा मनिष मानकर, पोना जगदीश झाडे, रविंद्र गवळी, संदिप सांगळे, मोहित निरगुडे, तसेच निफाड पोलिस ठाण्याचे सपोनि पाटील, पोउनि पटारे, पोकॉ दरोडे, सानप, मपोना कोकणे, शिंदे यांचे पथकाने सदर कारवाई करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!