नवी मुंबईत स्पेशल २६ ची पुनराव्रुत्ती,पण पोलिसांनी डाव उधळला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नवी मुंबई(प्रतिनिधी) नवी मुंबई येथुन एक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असाच हा प्रकार आहे. अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस सांगून सहा
जणांच्या टोळक्यानं रात्री १०.१५  वाजता च्या सुमारास हॉटेलवर धाड टाकली. मात्र त्यानंतर अवघ्या चार तासांत खऱ्या पोलिसांनी या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती
पोलिसांकडून देण्यात आली आहे.याबाबतचा एक व्हिडीयो सध्या व्हायरल होतोय





या घटनेबाबत सवीस्तर  माहिती अशी की, नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये राजमहाल नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री १०.१५ वाजताचे  सुमारास या हॉटेलवर अचानक सहा जणांच्या टीमने धाड टाकली. त्यांनी आपन अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी असल्याचं हॉटेल व्यवस्थापनाला सांगितलं. त्यानंतर सर्व ग्राहकांना हॉटेलबाहेर काढलं. त्यानंतर या हॉटेलमध्ये चुकीचं काम सुरू आहे, असं सांगत त्यांनी तेथील दोन महिलांना किचनमध्ये बंद केलं. त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. बिलाचे पैसे न भरताच ग्राहकांना बाहेर काढण्यात आल्यामुळे त्यातही हॉटेल मालकाचं पन्नास ते साठ हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच पैसे न दिल्यास तुम्हाला सर्वांना पोलिस स्टेशनला घेऊन जाऊ म्हणत त्यांच्याकडून पैसे
उकळण्यात आले.
मात्र पुढच्या काही तासात ज्यांनी धाड टाकली ते कोणी अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली या टोळीमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ हॉटेलबाहेर असलेल्या
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!