बनावट नकली सोने देऊन फसवनुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नकली सोने देऊन फसवणुक करणाऱ्याला परभणी पोलिसांनी केली अटक…

परभणी (प्रतिनिधी) – नकली बनावट सोने असली असल्याचे भासवून त्या बदल्यात पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिताफीने परभणी पोलिसांनी अटक केली आहे. माञ सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना अशा प्रकारचे बनावट सोने देतो म्हणून फसवणुक केलेली आहे. या आरोपीला जप्त मुद्देमालासह पो.स्टे. सोनपेठ यांच्या ताब्यात दिले असून त्याच्याकडून आणखी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.११जानेवारी २०२३) रोजी फिर्यादी सेवादास दत्तराव जाथच (वय ३५ वर्षे) जात बंजारा व्यवसाय शेती व आडत दुकान रा.आरंभी, ता. डिग्रस, जि.यवतमाळ यवतमाळ यास आरोपी नंदु आवडू शिंदे व ईतर रा. डोबवाडी तांडा ता. सोनपेठ, जि.परभणी यास एक किलो सोने पंधरा लाख रुपयात देतो असे म्हणून बोलावून घेऊन त्यास कोणतेही सोने न देता त्याचेजवळील नगदी पंधरा लाख रुपये घेऊन पळून गेले. सदर प्रकरणी पो.स्टे. सोनपेठ येथे गुरनं १०/२०२४ कलम ४२०,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सदर गुन्हयाचा समांतर तपास पो.स्टे. सोनपेठ व स्थागुशा परभणी यांचेकडून करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा, परभणीच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सदरचा गुन्हा नंदु आवडू शिंदे व त्याचे साथीदारांनी केला आहे. सदर माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे पथकाने सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे नंदु आवडू शिंदे (वय ४५ वर्षे) रा. डोबाडीतांडा, ता.सोनपेठ, जि.परभणी हा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा ईतर एक साथीदारासह केल्याचे सांगून त्याचे हिश्याला आलेले नगदी पाच लाख रुपये त्याचे घरी ठेवल्याचे सांगितल्याने त्याचेकडून जप्त केले आहेत. तसेच त्याचेकडून पिवळया धातूच्या गिण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना अशा प्रकारचे बनावट सोने देतो म्हणून फसवणुक केलेली आहे. सदर आरोपीस जप्त मुद्देमालासह पो.स्टे. सोनपेठ यांचे ताब्यात दिले असून त्याचेकडून आणखी अशा स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी.डी. भारती, पोउपनि अजित बिरादार, पोउपनि गोपीनाथ वाघमारे, पोहेकॉ/ सचिन भदगें, पोहेकों/रंगनाथ दूधाटे, पोहेकॉ राहुल परसोडे, मपोहेकॉ/जयश्री आव्हाड, मपोह /आशा शेल्हाळे, मपोह/अनिता राठोड, बालासाहेब तुपसुंदरे, निलेश परसोडे, शेख रफीयोचीन, दिलावर पठाण, रवि जाधव, पोशि/सरीता थडवे, पोशि/अर्चना पवार, पोना/सिध्देश्वरचाटे, पोशि/हनुमान ढगे, पोशि/परसराम गायकवाड, पोशि/दिलीप निलपत्रेवार, पोशि/मंचक दूबे, मधूकर ढवळे, विष्णु चव्हाण, पोशि/राम पीळ, चालक पोना/संजय घूगे, चापोशि/ केंद्रे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!