शासकिय कर्मचारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या व्यवसाईकांना वेगवेगळ्या कारणांनी ठगणार्या ईसमास परभणी पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

परभणी- सवीस्तर व्रुत्त असे की परभणी शहरात दिनांक 27/04/2023 रोजी शगून कलेक्शन या दुकानात आरोपीने स्वत:
जिल्हाधिकारी साहेबांचा PA आहे असे सांगून फिर्यादीस सांगितले की  जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रमजान ईद निमीत्त गोर गरीब नागरीकांना पैसे व कपड्याचे वाटप करण्यात येणार आहेत. त्याकरीता आपण 2,10,000/- रुपये नगदी व सँपल कपडे घेवून चला आम्ही पैसे व कपड्यांचे बील तुम्हाला देवू वगैरे सांगून कार्यालयातून पैसे घेवून पसार झाला. अशा आशयाच्या तक्रारी वरून पोलिस स्टेशन नानलपेठ, परभणी येथे गु.र.नं. 140/2023 कलम 406, 420 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि.  बालाजी पुंड हे करीत होते.
सदर गुन्हा हा शासकीय अधिकाऱ्यांचे नाव सांगून घडला असून यापुर्वी देखील सदर आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे करून व्यापाऱ्यांची फसवणूक करीत असल्याने . पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांनी स्था.गु.शा. चे अधिकारी व तपासी अंमलदार
यांना सदर आरोपीचा शोध लावणे बाबत आदेश व सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्था.गु.शा. व पो.स्टे. नानलपेठ चे पथकांनी सदर आरोपीचा शोध घेवून गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचे खरे नाव

शेख बाबू ऊर्फ बाबूमीया पि. शेख छोटू मिया वय 40 वर्ष रा. रशीद टेकडी, नई आबादी, भोकर, जि. नांदेड





असे निष्पन्न केले. त्याचे या मुळ नावावरून आरोपीचा शोध घेत असतांना माहिती मिळाली की सदर आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पो.स्टे. चिखली, जि. बुलढाना येथे अटक आहे. त्यावरून दिनांक 17/10/2023 रोजी सदर आरोपीस चिखली पो.स्टे. येथूल सदर गुन्ह्यात सदर गुन्ह्याचे तपासात अटक करून दिनांक 18/10/2023 रोजी मा.न्यायालयात हजर केले असता
मा.न्यायालयाने आरोपीस दिनांक 21/10/2023 रोजी पावेतो पोलिस कोठडी दिलेली आहे.



सदर आरोपीने यापुर्वी अनेक ठिकाणी अशाचे प्रकारे शासकीय कार्यालयातील अधिकारी यांचे नावे सांगुन व्यापारी व प्रतीष्ठीत लोकांना फसवणुक करुन पैशाची लुबाडणुक केलेली आहे. त्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन चे नाव
नवामोंढा जि परभणी,नानलपेठ जि परभणी,चिखली जि बुलढाना
विजापुर नाका जि सोलापुर,आर्णी जि यवतमाळ,कदीम जालना जि जालना, गोपालपुरम हैद्राबाद,उसमानिया युनिर्वसीटी हैद्राबाद
लन्गेर हाउस हैद्राबाद,तुकाराम गेट सिकंद्राबाद,विमानतळ पोस्टे जि पुणे,वजिराबाद जि वजिराबाद तेलंगना,1 टाउन पिएस निजामाबाद तेलंगना1 टाउन पिएस निजामाबाद तेलंगना,मलकाजगीरी पीएस राचककोंडा तेलंगना,सरुरनगर पिएस राचककोंडा
पोलिस अधीक्षक परभणी श्रीमती रागुसधा आर. यांचे कडून नागरीकांना व व्यापाऱ्यांना आव्हान करण्यात येते की, अशा प्रकारे शासकीय कार्यालयाचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून कुणी इसम काहि व्यवहार करण्यासाठी आल्यास समक्ष कार्यालयातून खात्री करूनच पुढील रितसर कायदेशीर मार्गाने व्यवहार करावेत. जेणे करून कुणाची फसवणूक होणार नाही.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!