स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथे पकडला लाखोंचा प्रतिबंधीत गुटखा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटख्यासह दोघांना घेतले ताब्यात….

गंगाखेड(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे आदेशानुसार दिनांक २४/११/२४ चे रात्री चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.पी.डी. भारती व पोलीस अंमलदार हे शासकीय वाहनातून पो.स्टे. गंगाखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना पहाटे ०४.०० वा. सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम शिवम निरस हा त्याचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर वाहना मधून शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आणून परळीनाका येथे एका गाळयात उतरवत आहे.





अशा खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन दोन पंचासह परळी नाका येथे पहाटे ०५.४० वा. छापा मारला असता २७ पांढ-या रंगाच्या पिशव्यासह शिवम डिगांबर निरस याचे ताब्यात मिळून आल्या. त्यास विचारपूस करता त्याने सदरचा गुटखा परळी येथील राहणार अजमत शेख याचेकडून खरेदी करुन आणल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातील पिशव्यांची  पहाणी केली असता त्यात ४७२५००/- रु  किमतीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा-१००० नांव असलेला गुटखा, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर एम.एच.-४८ एफ-१८२९ असा एकुण ७,७२५००/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी १) शिवम डिगांबर निरस रा. पडेगाव ता. गंगाखेड, २) अजमत शेख रा. परळी यांचे विरुध्द पो.स्टे. गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास गंगाखेड पोलिस करीत आहेत.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी,अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, यांचे उपस्थितीत सपोनि.पी.डी.भारती, पोलिस अंमलदार लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, परसराम गायकवाड, उत्तम हनवते, दिलीप निलपत्रेवार, मोहम्मद इम्रान यांनी केली



 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!