
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या,५ गुन्हे केले उघड…
पिपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ११/१०/२३ रोजी दुपारी २.०० वा चे सुमारास इंदोरी गावातुन तळेगाव दाभाडे जाणारे पुर्व- पश्चिम चालीचे डांबरी रोडवर इंदोरी गावचे हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय इंदोरी समोर फिर्यादी सौ सुषमा प्रदीप चव्हाण वय २५ वर्षे, रा. इंदोरी ता. मावळ जि पुणे पायी चालत घरी रस्त्याने पायी चालत जात असतांना दोन इसम मोटर सायकल वरुन त्यांचे पाठीमागे आले त्या दोन इसमांचेपैकी पाठीमागील इसमाने फिर्यादी यांचे गळयात हात घालुन त्यांचे गळयातील गंठण जबरीने चोरुन नेले याबाबत तळेगाव एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशन, २५२/२०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-५ पिपरी-.चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली पोउप-नि राहुल कोळी, पोहवा ७१८ बनसुडे, ठाकरे, राठोड, मालुसरे, पोना शेख, खेडकर , इघारे, गाडेकर, भोसले असे करीत असतांना ठाकरे, पोहवा मालुसरे, पोना शेख यांनी इंदोरी- देहुगाव- तळवडे चिखली मोशी आळंदी पर्यत अंदाजे ७० ते ७५ ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज बारकाईने चेक करत जावुन आरोपीचा माग काढुन आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर दि. २१/१०/२०२३ रोजी सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी आकाश राठोड, विसाम नानवत व बिश्राम नानावत यांचा शोध चालू असतांना सायंकाळी ०४.३० वा. चे सुमारास पोहवा ठाकरे व मालुसरे यांना खबर मिळाली की आरोपी विसाम नानवत व बिश्राम नानावत हे जुन्या पुणे मुंबई हायवे रोडलगत
शेलारवाडी बसस्टॉपजवळ थांबलेले आहेत सदर ठिकाणी पोउपनि राहुल कोळी यांनी स्टाफसह जावून शिताफीने आरोपींना
ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कौश्यल्यपुर्ण तपास केला असता सदरचा गुन्हा आरोपी
१) आकाश वजीर राठोड रा. मुलखेड, लवळे फाटा, ता. मुळशी जि.पुणे


२) विसाम राकेश नानावत, वय २० वर्षे रा. कंजारभट आहिरवाडे रोड ता. मावळ जि. पुणे मिळुन केल्याचे व आरोपी नामे

३) बिश्रांत राकेश नानावत, वय २२ वर्षे रा. कंजारभट आहिरवाडे रोड ता. मावळ जि. पुणे

यास सोबत घेवुन आळंदी येथे सदर गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करीता गेले असल्याचे तपासात उघड झाले असून आरोपींनी कबुली दिल्याने अटक आरोपी विसाम नानावत याचेकडे पोलिस कस्टडी दरम्यान पोउपनि राहुल कोळी यांनी कसुन चौकशी केली असता अटक आरोपींनी तळेगाव एमआयडीसी, देहूरोड तसेच दिघी पोलिस स्टेशनचे हद्दीत आकाश राठोड व बिश्रांत नानावत याचेसोबत दुचाकीवर जावून धुम स्टाईलने चैन स्नॅचिंग केलेल्या आहेत. आरोपी विसाम नानावत याचेकडून एकूण ०५ चैन चोरीतील ६६.५६ गॅम सोन्याचे दागिने व ०१ दुचाकी वाहन तसेच ०१ मोबाईल असा एकुण २,९७,०२०/- रूचा मुद्देमाल जप्त केला आहे व जप्त मालावरुन खालील पोलिस ठाण्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) तळेगाव एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशन, २५२/२०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४,
२) तळेगाव एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशन २३० / २०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४,
३) देहुराड पोलिस स्टेशन, १३९ / २०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४,
४) देहुराड पोलिस स्टेशन, १०० / २०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४,
५) दिघी पोलिस स्टेशन २४० / २०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४,
सदरची कारवाई.पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह. पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप-आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे. सहा पोलिस आयुक्त गुन्हे, सतिश माने, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, यांचे मार्गदर्शनाखाली पोउप-नि राहुल कोळी, पोहवा बनसुडे, ठाकरे, राठोड, पोना मालुसरे, शेख, पोशि खेडकर, इघारे, गाडेकर, भोसले, ब्रम्हांदे यांनी केली आहे.


