गांजाची तस्करी करणारे लागले पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात…
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 1 कोटी 31 लाखांचा गांजा केला जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कार्यवाही…
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नीदेवल सिध्दार्थ शर्मा, सन्नीदेवल भगवानदास भारती आणि सौरभ निर्मल यांना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे आणि हनुमंत भाऊसाहेब कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर 30 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 25 लाख 39 हजार किमतीचा 25 किलो गांजा, चारचाकी आणि चार मोबाईलचा समावेश आहे. आरोपींनी गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे यांच्याकडून आणला होता. तो सौरभ निर्मल यास विकणार असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंमली विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व रणधीर माने यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने (दि.12 जानेवारी) रोजी रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्के वस्ती येथून तिघांना अटक केली. आरोपी कृष्णा मारुती शिंदे (वय27वर्षे)रा. शिंदे वस्ती, शिरतपुर, ता. कर्जत. जि. नगर), अक्षय बारकु मोरे (वय29 वर्षे) रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय-35 रा. कुसडगाव, ता. जामखेड) यांच्याकडून 30 लाख 55 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये 25 लाख 69 हजार 100 रुपये किंमतीचा 25 किलो 691 ग्रॅम गांजा आणि एक शेवरोलेट क्रुझ कार (एमएच 14 सी.डब्ल्यु 0007), चार मोबाईल व 1600 रुपये रोख जप्त केले होते. आरोपींनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे (वय32वर्षे) रा. उंडेगाव ता. परांडा, जि.धाराशिव) याच्याकडून आणून गौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकणार होते. याबाबत रावेत पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता तो धाराशिव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने उंडेगाव येथून आरोपी देवा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 लाख 20 हजार रुपये किंमतीचा 50 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा गौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकण्यासाठी आणला होता. आरोपी देवा गांजाची तस्करी करण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन ॲम्बुलन्स जप्त केल्या आहेत.
तसेच (दि.13 जानेवारी) रोजी पथकाने महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी पार्क समोरील सर्व्हिस रोडवरुन सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा (वय31वर्षे), सन्नीदेवल भगवानदास भारती (वय23वर्षे), दोघे रा. रा. कुरुळी फाटा, मुळ रा. सराई गाढ ब्लॉक जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 लाख 79 हजार 600 रुपयांचा 20 किलो 196 ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपींनी हा गांजा उत्तर प्रदेशातील राजेश कुमार (रा. घोरावल) याच्याकडून आणल्याची कबुली दिली.
अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक, पोलीस अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदिप शेलार, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे व पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.