दोन संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केले ६ वाहनचोरीचे गुन्हे…..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वाहनचोरी करणाऱ्या आरोपींना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन  एकुण ०६ गुन्हे केले उघड….

देहु रोड(पिंपरी चिंचवड)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंधघालण्याचे आदेश पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यानअनुषंगाने देहुरोड पोलिस तपास पथकाला काही मुले चोरीचे दुचाकी मोटार सायकल विक्रीकरीता काळोखे चौक, विठ्ठलवाडी देहूगांव, पुणे येथे येणार आहे





अशी बातमी मिळाली बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी
सापळा लावला असता बातमी प्रमाणे दोन मोटार सायकलवरुन आलेले १) रोहीत विशाल सकटे, वय २२ वर्षे, रा. माळवाडी, हनुमान मंदीराच्या बाजुला, देहूगांव, पुणे २) युवराज शरद जाधव, वय १७ वर्षे, रा. देहूफाटा शिंदेवस्ती, तळेगांव चाकण रोड, सुदवडी, ता. खेड, जि. पुणे ३) रोहित विठ्ठल मादळे, वय १७ वर्षे, रा. मराठी शाळेच्या उजव्या बाजुला विठ्ठलवाडी देहूगांव, पुणे ४) अमर कचरुबा वाघमारे, वय १७ वर्षे, रा. वडाचा मळा, सरस्वती मंगल कार्यालयाच्या बाजुला, काळे यांचे घरी भाड्याने, देहूगांव, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता  त्यांच्याकडील दोन्ही मोटार सायकल चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले



सदर बाबत देहूरोड पोलिस स्टेशन व चिखली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. यातील आरोपी रोहीत विशाल सकटे याला
देहुरोड पोलिस स्टेशन गुरनं. ६८१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ गुन्ह्यात अटक करून त्याची पोलिस कोठडी रिमांड मिळवुन अधिक तपास केला असता त्याने त्याचे साथीदारांच्या मदतीने चोरी केलेल्या आणखी ०४ मोटार सायकली हस्तगत केलेल्या आहेत. अद्यापपर्यंत केले तपासात २,४०,०००/- रुपये किंमतीच्या ०६ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.



१) देहुरोड पोलीस स्टेशन गुरनं. ६८१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
२) चिखली पो.स्टे.गु.र.नं. २८३ / २०२४ भादवि कलम ३७९ ३) महाळुंगे पो.स्टे. गु.र.नं. ३५४ / २०२४ भादवि कलम ३७९,
४) भोसरी पोलीस स्टेशन गुरनं. ३७० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ ५)खडकी पोलीस स्टेशन गुरनं. १४६ / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ ६)चतुःऋगी पोलीस स्टेशन गुरनं. ५२७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ येणे प्रमाणे मोटार सायकल चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आलेले असुन देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे,अपर पोलिस
आयुक्त  वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परि २ बापू बांगर,सहा
पोलिस आयुक्त, देहुरोड विभाग देविदास घेवारे.,वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस अंमलदार सुनिल यादव, किशोर परदेशी, बाळासाहेब विधाते, बळीराम चव्हाण, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!