पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांची कुख्यात विक्की मल टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पिंपरी-चिंचवड– (महेश बुलाख)

पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारेसराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस
आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ३० संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २४८ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केलीआहे. वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ६६७ / २०२३ भादवि ३०८, ३६४, ३९४, ३८४, ३२५, ३२३, ५०६, ३४
या गुन्हयांचे तपासामध्ये आरोपी





(१) विकी रामप्रसाद मल, ( टोळी प्रमुख) वय ४२ वर्षे, रा. कैलासनगर,थेरगाव पुणे



(२) प्रसाद रोहीदास भापकर, वय २४ वर्षे, रा. मोहन नखाते चाळ, शिवशक्ती कॉलनी, रहाटणी



(३)प्रतीक अंतवण पवार, रा. थेरगाव पुणे

यांच्ये विरुध्द वाकड, पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत – दरोडा, जबरी चोरी,गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबुन ठेवणे, खंडणी मागणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करने वाहनांची तोडफोड करणे, तसेच वाहनांची जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे, असे विकी मल टोळीवर एकुण १५ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत दाखल आहेत.वरील टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रणअधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी , अपर पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे,  अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,  पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे .पोलिस उप-आयुक्त (परीमंडळ २) काकासाहेब डोळे, सपोआ बाळासाहेब कोपनर (गुन्हे -१), सपोआ विशाल हिरे (वाकड विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि पी. सी. बी ( गुन्हे शाखा), वपोनि गणेश जवादवाड (वाकड पो.स्टे), तसेच अंमलदार पो हवा सचिन चव्हाण, पो. हवा. व्यंकप्पा कारभारी, (पी. सी. बी. गुन्हे शाखा), सफौ सुहास
पाटोळे, पो.ना. शिमॉन चांदेकर (वाकड पो.स्टे.) यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!