
बेपत्ता ईसमाचा खुनी शोधण्यात हिंजवडी पोलिसांना यश…
हिंजवडी(पिपरी-चिंचवड) महेश बुलाख. –
सवीस्तर व्रुत्त असे की हिंजवडी पोलिस ठाणे येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार वय – ३० हीने माहीती दिली की, तिचा पती- किशोर प्रल्हाद पवार वय – ३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. त्याप्रमाणे मनुष्य मिसिंग रजि. नं. १८०/२०२३ प्रमाणे दाखल आहे. सदर मनुष्य मिसिंगचा तपास सहा. फौजदार हरीभाऊ रणपिसे हे करीत असताना नमुद मनुष्य मिसिंग मधील प्रकार हा संशयास्पद असल्याने सर्व शक्यता गृहीत धरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी हिंजवडी पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे, व राम गोमारे व गुन्हे पथकातील अंमलदार यांना मार्गदर्शन करून समांतर तपास करणेबाबत आदेशित केले. गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना मिसिंग व्यक्ती किशोर प्रल्हाद पवार हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वा. चे सुमारास त्याचा मित्र अक्षय भास्कर खिल्लारे वय २१ रा. दसरा चौक बालेवाडी पुणे मुळ गांव – मु.पो. आसेगांव ता. वसमत जि. हिंगोली याची मोटरसायकल वरुन कोठेतरी गेला असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन अक्षय खिल्लारे यांस ताब्यात घेवून कसुन विचारपुस करीत असता अक्षय भास्कर खिल्लारे याने सांगितले की, मिसिंग व्यक्ती किशोर पवार याची पत्नी रेणुका पवार हिचेशी त्याचे अनैतिक संबंध आहे याबाबत किशोर याला माहिती झाल्याने तो दोघांवर संशय घेवु लागला होता त्यामुळे अक्षय खिल्लारे याने दिनांक २४/०९/२०२३ रोजी किशोर पवार याचा खुन करण्याचे उददेशाने कमरेला विळा अडकवून किशोर पवार याला फोन वरुन “माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे माझ्यासोबत चल” असे खोटे सांगुन सायंकाळी ०५.३० वा. त्याचे राहते घरातुन सुसगांव ता. मुळशी जि. पुणे येथुन मोटरसायकलवरुन वारक या गावातील मुळशी डॅमचे धरणाचे पाण्यात ता. मुळशी जि. पुणे चे जवळ घेवुन जावुन लघवी करण्याचा बहाणा करून पाठीमागुन विळयाने त्याचे मानेवर व चेहऱ्यावर वार करून त्यास जिवे मारुन कोणाला सापडु नये यासाठी त्याचे कपडयाने त्याचे हात पाय बांधुन वारक या गावातील मुळशी डॅमचे धरणाचे पाण्यात ता. मुळशी जि. पुणे येथे टाकले असे सांगितले. त्याचे सांगणेप्रमाणे यातील मिसिंग व्यक्तीचे प्रेत त्याने दाखविलेल्या घटनास्थळी मिळुन आल्याने त्यास अटक केली. हिंजवडी पोलिसांनी सदर प्रकरणी गु.र.नं. १११८/२०२३ भा.द.वि. कलम ३६४, ३०२, २०१ प्रमाणे आरोपी अक्षय भास्कर खिल्लारे वय-२१ रा. दसरा चौक बालेवाडी पुणे मुळ गांव- मु.पो. आसेगांव ता. वसमत जि. हिंगोली याचेवर गुन्हा दाखल करुन त्यास सदर गुन्हयात दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ००/५० वा. अटक करण्यात आली असुन हिंजवडी पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा तपासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय सदर गुन्हयाचा पुढील तपास . अजितकुमार खटाळ सहायक पोलिस निरीक्षक हे करीत आहेत.


सदरची कामगीरी विनयकुमार चौबे , पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, डॉ. संजय शिंदे अपर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. वसंत परदेशी, सह पोलिस आयुक्त पिं.चिंचवड काकासाहेब डोळे पोलिस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, डॉ. विशाल हिरे सहा. पोलिस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, डॉ. विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिंजवडी पोलिस ठाणे, सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख पोलिस निरीक्षक (गुन्हे) हिंजवडी पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस ठाणेकडील तपास पथकातील सागर काटे, राम गोमारे, अजितकुमार खटाळ, सहा. पोलिस निरीक्षक, बंडु मारणे, बापुसाहेब धुमाळ, बाळकृष्ण शिंदे, सहा. पोलिस उप निरीक्षक पो हवा., कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, सुनिल डामसे, अरुण नरळे, नरेश बलसाने पोलीस नाईक रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, पोलीस शिपाई अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे व दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांनी केली.



