
अवैधरित्या शस्त्र बाळगणारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली सराईत गुन्हेगारांना अटक…
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ पि.चिं. यांच्या दरोडा विरोधी पथकाचे आणि पो.नि. बाळकृष्ण सावंत अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती घेत होते.


दरोडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेत असताना पोलीस शिपाई सुमित देवकर व पोलीस शिपाई गणेश सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे (दि.२४जानेवारी) रोजी पथकाकडील पो.उप.नि. भरत गोसावी तसेच पो.हवा गणेश हिंगे, पो.शि. सुमित देवकर, पो.शि. विनोद वीर व पो.शि. गणेश सावंत यांनी रेकॉर्डवरील आरोपी नामे विरभद्र रघुनाथ देवज्ञ (वय ३० वर्षे), रा.भाऊसाहेब मुंगसे यांच्या खोलीत, केळगाव रोड, देवाची आळंदी पायथा हॉटेल आंळदी घाट जवळ चाकण रोड, आळंदी पुणे येथुन २१/४५ वा.सू. ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ०१ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करुन त्यांच्याविरुद्ध (दि.२५जानेवारी) रोजी ००/४४ वा.सू. आळंदी पोलीस स्टेशन पिं.चि. येथे गु.र.नं.- १८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे १) राहुल बसवराज सर्जन (वय ३० वर्षे), रा.चक्रपाणी वसाहत हनुमान कॉलनी भोसरी, पुणे ३९, २) अमोल फिलीप साळवे (वय ३० वर्षे), रा.आळंदी रोड गव्हाणे पेट्रोलपंपच्या मागे विठ्ठल दर्शन सोसायटी, भोसरी पुणे, यांना सुध्दा दाखल गुन्हयात (दि.२५जानेवारी) रोजी सकाळी ११/०० वा.सू. अटक करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा तपास दरोडा विरोधी पथकाकडे आल्यावर तपासादरम्यान दाखल गुन्हयातील अटक आरोपी नामे अमोल फिलीप साळवे (वय ३० वर्षे) रा.आळंदी रोड, विठ्ठल दर्शन सोसायटी, भोसरी पुणे यांच्या कडुन अजून ०२ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. आता पुढील तपास भरत गोसावी पोलीस उप निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा हे करीत आहेत.

अशा प्रकारे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड, डॉ.संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, विवके मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, गणेश हिंगे, विनोद वीर, महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी, व पोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.



