देशी कट्टा बाळगणार्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

भारती विद्यापीठ( पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे की
दिनांक २४/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कार्य करीत असताना पोलिस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, आंबेगाव बु, जांभुळवाडी तलाव येथे एक इसम गावठी कट्टा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी
जांभुळवाडी तलाव येथे जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तेथे मामा पान शॉप पुढील पुलावर बातमीप्रमाणे इसम आढळून आला त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव

योगेश हनुमंत मालुसरे, वय ४१ वर्षे, धंदा चालक, रा. सध्या फ्लॅट नंबर ४०१, ओम हाईटस, सिध्दीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे मुळ रा.मु.पो वांगणी, ता.वेल्हा, जि.पुणे





असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ४००/- रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुस असा एकुण ४०, ४०० /- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६५/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५
महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाख करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ हे करीत आहे.
सदरची कामगिरी  रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह आयुक्त, पुणे शहर),  प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती
स्मार्तना पाटील सारे,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर,सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील गट पोलिस निरीक्षक विनायक  गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक
अमाल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार निलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमाले, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत थनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!