वारजे-माळवाडी हद्दीत वसतीग्रुहात होणार्या चोऱ्यांचा सुत्रधार निघाला उच्चशिक्षित चोर,मुदेमालासह ७ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वारजे -माळवाडी(पुणे शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की वारजे-माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये कॉलेज परिसरतील बिल्हींग / हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थांनी  बुट अथवा दरवाज्याजवळ ठेवलेली चावी वापरुन त्यांचे रुममध्ये चार्जिगला लावलेले किंवा  रुममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचे प्रकार घडत असल्याने वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर ४५२ / २०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. अशा प्रकारे वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील  जैतापुरकर व पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांनी तपास पथकातील अधिकारी  नरेंद्र मुंढे यांना लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत योग्य त्या सुचना देवून कर्वेनगर कॉलेज परिसरात तपास पथकातील अंमलदार यांना पेट्रोलिंग करणेबाबत व सापळा लावून कारवाई करनेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी नरेंद्र मुंढे व
तपासपकतील स्टाफ पोहवा शेलार, पोना मासाळ, पोशि भुरुक, पोशि मोरे, खिलारी आणि  कामटे असे दिनांक ३१/१०/२०२३ रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाणे गुरनं ४५२/२०२३ भादंवि कलम ३८० मधील घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील प्राप्त फुटेज मधील लॅपटॉप चोरी करण्याच्या संशयित इसमाचा शोध घेत असताना पोउपनिरी मुंढे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन सापळा लावून नमूद स्टाफसह फुटेज मधील इसम

अर्जुन तुकाराम झाडे, वय २२ वर्षे





यास त्याचे राहते रुम मधून ताब्यात घेवून त्याचेकडे रुममध्ये मिळुन आलेल्या लॅपटॉप बाबत विचारपूस केली असता तो उडवा-उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागला. मिळुन आलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता नमूद गुन्ह्यातील चोरीस गेले लॅपटॉप
त्याचेकडे मिळुन आल्याने सदरचा गुन्हा त्याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास अधिक तपासकामी अटक करून त्यास
विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील वारजे, कर्वेनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड या
परीसरातून लॅपटॉप चोरी केले असल्याची तसेच तो यापुर्वी महाड रायगड येथे शिक्षणासाठी असताना त्याने महाड व मानगाव
येथे दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. नमूद आरोपीची मा. न्यायालयाकडून पोलिस कोठडीची रिमांड घेवून
आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीचे एकुन १२ लॅपटॉप, ०७ लॅपटॉप चार्जर, ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा, ०१ हेडफोन, ०२ दुचाकी
असा एकुन ६,४४,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरीक्षक
नरेंद्र मुंढे हे करत आहेत. आरोपीकडे आतापर्यंत झाले तपासात खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) पोलिस स्टेशन वारजे माळवाडी कलम ३८० भादवि -७ लॅपटॅाप,१ सोनी कॅमेरा 



२)पोलिस स्टेशन भारती विद्यापीठ कलम ३८० भादवि -२ लॅपटॅाप



३)पोलिस स्टेशन सिंहगड रोड कलम ३८० भादवि – १ लॅपटॅाप

४)पोलिस स्टेशन महाड शहर जिल्हा रायगड,कलम ३७९भादवि – १ मोपेड

५) पोलिस स्टेशन मानगाव जिल्हा – रायगड कलम ३७९भादवि १ मोपेड

सदरची कामगिरी रितेश कुमार,पोलिस आयुक्त पुणे शहर, संदीप कर्णिक पोलीस सहआयुक्त, प्रविण पाटील पश्चिम प्रादेशिक विभाग,  सुहेल शर्मा परिमंडळ ०३,  भिमराव टेळे  सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग,  सुनिल जैतापुरकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन अजय  कुलकर्णी पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक  नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलिस अंमलदार प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण
यांनी केली आहे..





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!