शुल्लक कारणावरुन तिक्ष्ण हत्याराने खुन करणाऱ्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी…

दौड(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील रिकव्हरी नोटीस घेवून बारामती विभागात वाटप करणेसाठी गेले होते. नोटीस वाटप केल्या नंतर रात्रौ ०८.०० वा चे दरम्यान ते त्यांचेकडील मोटार सायकल ने बारामती वरून बारामती-पाटस रोडने पुण्याकडे जात असताना वासुंदे गावचे अलीकडे त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने तलवारी सारखे दोन्ही बाजूने धारदार असलेले लोखंडी तिक्ष्ण हत्याराने पोटात खूपसून त्यांचा खून केला आहे.





अशा म्रुतकाचा मुलगा प्रविन मळेकर याचे तक्रारीवरुन दौंड पोलिस स्टेशन गु.र.नं. १६४/२०२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे अज्ञाताविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असुन पोलिस अधिक्षक  पंकज देशमुख,अपर पोलिस अधीक्षक, बारामती विभाग संजय जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव दौंड विभाग, दौंड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. स्था. गु. शा. चे पथक व दौंड पोलिस स्टेशनकडील तीन पथके तयार करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता काही लोकांकडून अशी माहीती मिळाली की यातील आरोपी हा काहीही कारण नसतांना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दगड मारणे,त्यांना शिवीगाळ करणे याकारणावरुन मागील आठवड्यात सुध्दा असाच प्रकार घडल्याचे सांगीतल्याने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपीचे शोदार्थ पथके रवाना करुन सदर आरोपीस अटक केली त्यास सखोल चौकशीत त्याने म्रुतकाचा खुन का केला याचा खुलासा केला



यातील मयत इसम प्रवीण मळेकर हे बारामती पाटस रोडवरील वासुंदे गावातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोडवर मोटार सायकलसह खाली पडले होते, तेव्हा त्यांचे पोटात तलवारी सारखे दिसणारे लोखंडी हत्यार खुपसलेले हाते. त्यांना रोडने येताना रंजनाबाई मच्छिंद्र लोंढे स्मृती स्थळासमोर हत्याराने मारलेले असल्याचे समजले. तपासा दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्मृती ठिकाणाचे जवळ राहणारा दिपक रामदास लोंढे याने त्याचेकडील दोन्ही बाजूस धारदार असलेल्या लोखंडी हत्याराने मारून सदरचा खुन केला आहे. अशी बातमी मिळाल्याने इसम नामे दिपक रामदास लोंढे वय ३७ वर्षे रा. वासुंदे, रंजनाबाई मच्छिंद्र लोंढे स्मृतीस्थळाजवळ ता. दौंड, जि पुणे यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खुनाचा गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपीने त्याचेकडील लोखंडी दोनधारी हत्यार हे प्रवीण मळेकर यांचे पोटात खूपसले व प्रवीण मळेकर हे तेथून मोटार सायकलवर त्या परीस्थीतीत पुढे येवून पेट्रोल पंपासमोर खाली पडले. सदरचे खुन करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आलेले आहे. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करणेत आली आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पांडुळे, भोर विभाग, सासवड यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि अरविंद गटकुळ, तुकाराम राठोड, स्था. गु. शा. कडील, सपोनि राहूल गावडे,पोलिस अंमलदार असिफ शेख, सुभाष राउत, श्रीरंग शिंदे, मंगेश थिगळे, विजय कांचन, महेश भोसले, काशिनाथ राजापूरे, शरद वारे, किरण पांढरे, नितीन बोऱ्हाडे, पांडुरंग थोरात, धिरज जाधव, अमिर शेख, विशाल जावळे,संजय नगरे, सागर म्हेत्रे, योगेश गोलांडे, रविंद्र काळे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!