
मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे शिक्रापुर,नारायणगाव पोलिसांच्या सहकार्याने जुन्नर व शिरुर तालुक्यात छापे…
पुणे -( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव ,नारायणगाव येथे छापे टाकून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
ललित पाटील हा ससून रुग्णालयातून अंमली पदार्थाची तस्करी
करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, अंमली पदार्थ
विरोधी पथकाने राज्याच्या विविध भागात धाडसत्र सुरू केले आहे.
शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडीच्या दुर्गम भागात केलेल्या कारवाईत कोट्यवधींचा १७४ किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. मुंबईच्या पथकाने पोलिस स्टेशन,शिक्रापुर चे पोलिस निरीक्षक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना लगेच संपर्क करुन पाहीजे ती मदत केली व त्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, मिडगुलवाडीत झाडाझुडपांनी वेढलेल्या जागेत पत्र्याचे शेड टाकून हा अंमली पदार्थांचा धंदा सुरू होता. अनेकदा ग्रामस्थांनी येथे काय चालते, असे विचारले असता फरशी
पुसण्यासाठी लागणारे फिनेल बनविण्याचे काम चालत असल्याचे
संबंधित व्यावसायिक सांगतात मुंबई व आंध्र प्रदेशमधील हे लोक असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अल्प्राझोलम झोपेचे औषध म्हनुन वापरले जाते परंतु त्याच्या खुल्या विक्रीवर ते अंमली पदार्थ यात मोडत असल्याने बंदी आहे . परंतु त्याचा अंमली पदार्थ बनविण्यासाठी वापर करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे
नारायणगावमध्ये २६ किलो अल्प्राझोलम जप्त – पिंपळगाव ,
नारायणगाव येथील कारवाईत २६ किलो अल्प्राझोलम जप्त केले
आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. ‘एनसीबी’च्या
कारवाईला नारायणगाव पोलिसांनी दुजोरा दिला आहे. येथील
वडगाव सहानी रस्त्यालगत स्थानिक शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड आहे. हे शेड त्यांनी जुन्नर येथील एका व्यक्तीला भाड्याने दिले होते.
याठिकाणी अंमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची माहिती
मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार
या पथकाने कारवाई केली.




