सराईत चोरटा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी आणि मोटासायकल चोरी करणारा अट्टल चोरटा गजाआड…

पुणे (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण च्या पथकाने रात्रीच्या वेळी बंद केलेल्या परमिट बार मध्ये हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी चोरी व दिवसा मोटार सायकल चोरी करणारा सुशिक्षीत तरूण गजाआड करून १२ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख २२ हजार रू.चा मुद्देमाल जप्त केला आहे.





रात्रीच्या वेळी बंद केलेले परमिट बार हॉटेलची खिडकी, दरवाजे उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कम व दारूच्या बाटल्या असा माल चोरी जात असल्याच्या पाच घटना यवत पोलिस ठाणे हद्दीत घडल्या होत्या. प्रत्येक घटनेत एक इसम हातात कुऱ्हाड घेवून चोरी करत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेमध्ये अंकित गोयल पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.



या बाबत अधिक माहिती अशी की, यवत पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व घटनास्थळांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेटी देवून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व घटनांमध्ये एक इसम हातात कुऱ्हाड घेवून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले, घटनाक्रम व घटनास्थळ पडताळले असता चोरी करणारा इसम हा चोरी करून दौंड-काष्टी बाजूकडे जात असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने तपास पथकाने काष्टी परीसरातील गोपनीय बातमीदारांना सतर्क करून माहिती प्राप्त केली आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आदित्य बाळासाहेब कवडे (वय २१वर्षे) रा.कोळगाव मानमोटी घारगाव ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर यास ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता तो उच्चशिक्षीत असल्याचे समजले त्याने गुन्ह्यात यवत, बारामती, श्रीगोंदा परीसरातील हॉटेल च्या खिडक्या व दरवाजे उचकटून चोरी केली असून मोटार सायकल देखील चोरी केल्या असल्याचे कबूल केले. त्याचेकडून तपासादरम्यान रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकूण ३,२२,०००/- किं. चा मुद्देमाल हस्तगत केला असून या मध्ये एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.



आरोपीने १२ ठिकाणी केलेले गुन्हे –
१) यवत १६६०/२०२३ भादंवि ४५७,३८०
२) यवत १७४६/२०२३ भादंवि ४५७,३८०
३) यवत १३८६/२०२३ भादंवि ४५७,३८०
४) यवत १४८८/२०२३ भादंवि ४५७,३८०
५) यवत १७४९/२०२३ भादंवि ४५७,३८०
६) बारामती तालुका ९१२/२०२३ भादंवि ४५७,३८०
७) बारामती तालुका ९२३/२०२३ भादंवि ३७९
८) बारामती शहर १००४/२०२३ भादंवि ३७९
९) दौंड ११९२ / २०२३ भादंवि ३७९
१०) श्रीगोंदा ९१९ / २०२३ भादंवि ३७९
११) श्रीगोंदा ८८९ / २०२३ भादंवि ३७९
१२) हडपसर १९९० / २०२३ भादंवि ३७९

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पो स्टे चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, स्था.गु.शा. कडील सपोनि कुलदीप संकपाळ, पोउपनि अमित सिदपाटील, पोलिस अंमलदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, आसीफ शेख, अजित भुजबळ, निलेश शिंदे, राजू मोमीण, अतुल डेरे, यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!