अखेर लोणावळा शहरात वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या मुजोर विक्रेत्यांवर कार्यवाहीचा बडगा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.23/11/2023 रोजी लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग, लोणावळा
नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलिस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्र. 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर परीणामकारक कारवाई करण्यात आली तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महामार्गाचे कडेला लावण्यात येणा-या फळे व खाद्य पदार्थ विक्री करणा-या हातगाडयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. व नो पार्किंग मध्ये वाहने पार्क करणारे चालकावर
एकुण 32 केसेस करण्यात आलेल्या आहेत. आजच्या कारवाईमध्ये एकुण 63 केसेस व 48,800 /- रुपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे.
तसेच भविष्यात लोणावळा शहरामध्ये अनधिकृत फळ विक्रेते, अन्न पदार्थ विक्रेते महामार्गाच्याकडेला चार चाकी वाहने पार्क करुन निघून जाणे तसेच अनधिकृत साईन बोर्ड लावणे यांचेवर प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक वप्रादेशिक विभाग पुणे यांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी ही सहायक पोलिस अधीक्षक  सत्य साई कार्तिक उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा मार्गदर्शनाखाली सिताराम डुबल, लकीफ मुजावर पोलिस उप
निरीक्षक, वाहतुक विभागाचे पो. हवालदार शकिल शेख, अनिल शिंदे, सचिन कडाळे यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!