टेमुर्डा येथे शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या अज्ञात आरोपीला शेगाव पोलिसांकडून २४ तासांत अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या अज्ञात आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत शोधून गजाआड केले आहे.

घटनेचा तपशील: २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास टेमुर्डा येथे पीडित मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी एका अनोळखी दुचाकी चालकाने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले. काही अंतर पुढे गेल्यावर आरोपीने तिची छेड काढली. या घटनेमुळे प्रचंड घाबरलेल्या पीडित मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी मारली, ज्यामध्ये ती जखमी झाली. घटनेनंतर अज्ञात दुचाकी चालक तेथून पसार झाला.



पोलिसांची कारवाई व तपास: घटनेचे गांभीर्य ओळखून शेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक भारतीय न्याय संहिता  बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा २०१२ चे कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

सुरवातीला आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना शेगाव पोलिसांनी टेमुर्डा, वरोरा व परिसरात तांत्रिक तपास, गोपनीय माहिती (खबरी) आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे २४ तासांच्या आत आरोपीचा शोध घेतला.



  • अटक करण्यात आलेला आरोपी: गणेश बाळुराम कुमावत (वय ३४ वर्ष)

  • सध्याचा पत्ता: बोर्डा, तालुका- वरोरा



  • मूळ पत्ता: बासडी खुर्द, जिल्हा- जयपूर, राज्य- राजस्थान

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (टू-व्हीलर) जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.



तपास पथक:

ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावचे ठाणेदार (स.पो.नि.) योगेंद्रसिंग यादव, पो.उ.नि. दिलीप पोले, पो.उ.नि. सुमित कांबळे, स.फौ. दिलीप सुर, पो.ह. अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार आणि पो.शि. प्रशांत गिरडकर यांच्या पथकाने केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!