
IPS अधिकारी निकेतन कदम यांचे संकल्पनेतुन धारणी येथे तयार केलेल्या अभ्यासिकेतुन घडताय उद्याचे अधिकारी…
भापोसे अधिकारी निकेतन कदम धारणी येथे कार्यरत असतांना अभ्यासिकेच्या रुपात लावलेले रोपटे आता मोठे होऊन त्यातुंन घडताय शासकिय अधिकारी व कर्मचारी…
धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भापोसे अधिकारी असलेले व सध्या नागपुर येथे पोलिस उपायुक्त म्हनुन कार्यरत असलेले निकेतन कदम यांनी आपल्या धारणी येथील प्रोबेशन काळात धारणी पोलिस ठाण्यात विद्याथ्यांसाठी अभ्यासिकेची सुरूवात केली होती.आणि फक्त तीन वर्षात त्या अभ्यासिकेतून मेळघाटातील तब्बल ११ विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी मिळविली. २२ सप्टेंबर रोजी धारणी पोलिस ठाण्यातील गणपती विसर्जनाचे औचित्य साधून श्री निकेतन कदम सहपत्नीक धारणी शहरात आले असता त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आ. राजकुमार पटेल, तहसिलदार प्रदीप शेवाळे, ठाणेदार पोलिस स्टेशन धारणी अशोक जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ जवारकर उपस्थित होते.


भापोसे अधिकारी निकेतन कदम यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले होते अमरावती ग्रामीण पोलिस दलात सन २०२१ मध्ये श्नी निकेतन कदम यांची परीविक्षाधीन पोलिस अधिक्षक म्हनुन कालावधी पार पाडत असतांना तीन महिने निकेतम कदम यांनी धारणीचे ठाणेदार म्हणून कारभार सांभाळला. त्यावेळी केवळ तीन महिन्याच्या कालावधीत निकेतन कदम यांनी धारणी पोलिस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची तयारी करता यावी म्हणून एक अभ्यासिका सुरू केली. पोलिसांचे आरोग्य सदृढ रहावे म्हणून जीमसुध्दा सुरू केली.

परीविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर श्री निकेतम कदम हे लातुर जिल्हयात निलंगा येथे सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी म्हनुन रुजु झाले त्यानंतर ते नागपूर शहरात पोलिस उपायुक्त म्हणून रुजु झाले. निकेतम कदम यांनी सुरू केलेल्या अभ्यासिकेतून तीन वर्षात ११ विद्यार्थ्यानी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळविली. यामध्ये जितेंद्र क्षीरसागर (आसाम रेजिमेन्ट), अमर धीमरेकर (एसआरपीफ, अमरावती), कैलाश भिलावेकर, नेहा मालवीय (दोन्ही जिप शिक्षक), निशा चतुर, मुकेश पटेल, गायत्री पटेल, श्रवण धीकार (चौघेही जिप, आरोग्य विभाग), सारीका जावरकर, वर्षा कास्देकर (दोन्ही वन विभाग), दिनेश कास्देकर (तलाठी) यांचा समावेश आहे



