वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि संवेदनशिलता..
संवेदनशीलता म्हणजे काय ??
नागपुर(प्रतिनिधी) – संवेदनशिलता म्हणजे नेमके काय ?? म्हनजेच स्वतःला इतरांच्या जागी ठेवून पाहणे, स्वतःला ज्या अपेक्षा आहे त्याच अपेक्षा समोरच्या व्यक्तीला आहे असे समजून त्याच्याशी वागणे. कर्तव्याच्या ठिकाणी संवेदनशीलता ही फार उपयुक्त ठरते.
असाच एक अनुभव दि. (19) रोजी नागपूर शहरात “लोकसभा निवडणूक व मा. महोदय पंतप्रधान यांचे बंदोबस्ताच्या वेळी आला सर्व पोलिस यंत्रणा व्यस्त होती. सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास सिव्हिल लाईन परिसरामध्ये नुकत्याच निवड झालेल्या व दोन महिने प्रशिक्षण घेतलेल्या २ महिला पोलुस प्रशिक्षणार्थी बंदोबस्त कर्तव्याकरिता कार्यरत होत्या. या दोन्हीही महिला पोलिस यांची पोलिस खात्यात नुकतीच सुरुवात असल्याने त्या काहीशा भेदारलेल्या परंतु तितक्याच शिस्तीत उभ्या असलेल्या निरागस वाटत होत्या. त्या दोन्हीही महीला पोलिस,पोलिस कर्तव्य बजावत असताना तिथून एका वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. अचानकपणे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची गाडी आपल्याजवळ येऊन थांबल्यामुळे त्या घाबरल्या परंतु त्यांनी लगबगिने स्वतःला सांभाळत हातात लाठी असल्याने लाठी सॅल्यूट केला. महिला पोलिसांनी लाठी सेल्युट दिल्याने प्रतिउत्तरांमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी देखील त्यांना प्रतिसाद देत सॅल्यूट केला. तसेच चालकाला बाजूला गाडी घेण्यास सांगून त्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी गाडीच्या खाली उतरून त्यांची विचारपूस केली. त्यांच्याशी हितगुज केले असता असे समजले की, दोन्ही महिला पोलिस या प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पोलिस खात्यामध्ये भरती झालेल्या आहेत. एकीचे वडील शेतकरी तर दुसरीचे रिक्षा चालक आहेत बारावी व ग्रॅज्युएट असलेल्या या दोन्हीही मुली यांनी स्वबळावर पोलिस खात्यात प्रवेश मिळवला आहे .
पोलिसांचा सतत मागील काही काळापासून सलग बंदोबस्त चालू आहे त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा ही न थकता कर्तव्य बजावत कार्यरत होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची नजर त्या महिला पोलिसांच्या वर गेली असता त्या ठिकाणी एक संवेदनशीलतेची भावना मनात निर्माण झाली. व त्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना राहवले नाही आणि त्यांनी आवर्जून त्यांना त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात बोलावून त्यांना वडिलांप्रमाणे विचारपूस करतो तशी आपुलकीने विचारपूस केली. तसेच बंदोबस्त चांगल्या रित्याने पार पाडल्या असल्याकारणानें त्यांना मिठाई देऊन, त्यांच्याशी हितगुज साधून त्यांच्यातला थकवा दूर केला.
तसेच त्यांना त्यांच्या निवासस्थानामध्ये छायाचित्रे घेण्याची मुभा देखील दिली. या दोन्हीही मुलींचे नाव मपोशी प्रीती ज्ञानदेव मिंधे व मपोशी पूजा अशोक सहारे याप्रमाणे असून दोन्हीही महिला पोलिस या सध्या नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असून दोन्हीही मुंबई शहर पोलिस दलात भरती झाल्या असून प्रीती पुण्याची तर पूजा ही अमरावती येथे राहणारी आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या या संवेदनशील वागणुकी बाबत दोघींनाही अतिशय भरून आले व त्यांनी त्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे आभार देखील मानले. दोन्ही मुलींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्यावेळेस ते वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्याशी बोलत होते, त्यावेळेस त्यांना असे वाटत होते की , जणू काही त्यांचे वडीलच त्यांच्याशी बोलत आहे. ज्या वरिष्ठ पोलिस अधिकारी बाबत आपण बोलत आहोत ते आहेत
नागपूर शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल !