थक्क करणारी कामगिरी: गोंदियात ४० लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश; इंदूरमधून २६ तोळे सोन्याचे दागिने जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


गोंदिया: गोंदिया शहरातील सिव्हील लाईन परिसरामध्ये झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे. चोरांनी लांबवलेला ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी मध्य प्रदेशमधील इंदूर येथून हस्तगत केला आहे.

घटना नेमकी काय होती?

फिर्यादी अमोल श्रीराम मुंगमोडे (वय ४९, रा. रविशंकर वार्ड, सिव्हील लाईन, गोंदिया) हे आपल्या कुटुंबासह १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. बेडरुममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.





पोलिसांची तपास चक्रे आणि तांत्रिक पुरावे

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रेवचंद सिंगनजुडे यांनी तात्काळ तपासाची दिशा ठरवली. घटनास्थळी FSL (फॉरेन्सिक), फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडची पथके बोलावण्यात आली.



तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही घरफोडी कोटा (राजस्थान) येथील रेकॉर्डवरील आरोपी लाखन सिंग पिता प्रताप सिंग (रा. उदयपुर, राजस्थान) याने केल्याचे निष्पन्न झाले.



इंदूरमध्ये सासरवाडीतून माल जप्त

आरोपी चोरी केल्यानंतर इंदूर (मध्य प्रदेश) येथील ग्राम-देव-गुराडिया येथील आपल्या सासरवाडीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याουারে स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोंदिया पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या सासरच्या घरी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी आधीच पसार झाले.

मात्र, पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता, आरोपीची सासू बलवीर कौर सिंग हिच्याकडे एक काळ्या रंगाची गाठोड्यामध्ये दागीने सापडले. चौकशी दरम्यान आरोपींनी ते दागिने सासूला दिल्याचे स्पष्ट झाले.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

पोलिसांनी आरोपीच्या सासूकडून खालीलप्रमाणे एकूण २६ तोळे सोने व १ चांदीचा सिक्का (अंदाजे बाजारभाव ४०,००,००० रुपये) जप्त केला आहे:

  • २ नग सोन्याचे कंगन



  • १ नग सोन्याचा राणी हार

  • २ नग सोन्याचे चपलाकंठी हार

  • १ नग सोन्याचा मणी हार

  • १ नग सोन्याचा गोप लॉकेटसह

  • १ नग सोन्याचे मंगळसूत्र

  • १ नग सोन्याचे कॉईन व १ सोन्याची अंगठी

  • १ नग चांदीचा सिक्का

सदर धडाकेबाज कामगिरी गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!